Prime Minister Narendra Modi Mumbai Visit Affects Commuters, Versova Ghatkopar Service Will Be Closed During Peak Hours On Thursday 19 January 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या म्हणजेच गुरुवार 19 जानेवारी 2023 रोजी मुंबई दौरा आहे. या दौऱ्यावेळी वर्सोवा-घाटकोपर ही मेट्रो 1 सेवा बंद ठेवली जाईल. संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांपासून 7 वाजून 30 मिनिटांपर्यंत वर्सोवा-घाटकोपर ही मेट्रो 1 सेवा बंद असेल. ही गर्दीची वेळ आहे. यामुळे मेट्रो बंद ठेवण्याच्या निर्णयाचा प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या म्हणजेच गुरुवार 19 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता मेट्रो 2 ए (मेट्रो 2 अ) आणि मेट्रो 7 या 2 मार्गांच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान बीकेसी येथून या कार्यक्रमासाठी येणार आहेत. हा कार्यक्रम अंधेरी पूर्व येथील मेट्रो 7 वरील गुंदवली या मेट्रो स्टेशनवर होणार आहे. हे स्टेशन वर्सोवा-घाटकोपर मेट्रो 1 च्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवे (Western Express Highway) अर्थात वेह (पश्चिम द्रुतगती मार्ग) या स्टेशनच्या जवळ आहे. पण सुरक्षेसाठी संपूर्ण वर्सोवा-घाटकोपर ही मेट्रो 1 सेवा बंद ठेवली जाईल.
मेट्रो १ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवार 19 जानेवारी 2023 रोजी वर्सोवा-घाटकोपर ही मेट्रो 1 सेवा संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांपासून 7 वाजून 30 मिनिटांपर्यंत बंद असेल. मेट्रो 1 सेवा ऐन गर्दीच्या वेळी पावणे दोन तास बंद असेल.
वर्सोवा-घाटकोपर या मेट्रो 1 सेवेद्वारे दररोज सरासरी तीन लाख प्रवासी ये-जा करतात. संध्याकाळी गर्दीच्या वेळी वर्सोवा, अंधेरी, साकीनाका, असल्फा या भागातून लाखो नोकरदार मेट्रोचा वापर करतात. सेवा बंद राहणार असल्याने त्या सर्वांची गैरसोय होणार आहे. यामुळेच मेट्रो सेवा पूर्ण बंद करण्याऐवजी फक्त वेस्टर्न एक्सप्रेस हायवे (Western Express Highway) अर्थात वेह (पश्चिम द्रुतगती मार्ग) हे स्टेशन बंद ठेवावे. मेट्रो तिथे थांबवू नये अशी मागणी नागरिक करत आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.