Crime News : निर्मात्या पतीला पत्नीने मॉडेलसोबत रंगेहाथ पकडले, पतीने पत्नीवर चढवली गाडी

Kamal Kishor Mishra : चित्रपट निर्माता कमल किशोर मिश्रा गाडीमध्ये एका मॉडेलसोबत रोमान्स करत होता, जेव्हा पत्नीने त्याला रंगेहाथ पकडले तेव्हा मिश्राने आपल्या पत्नीला कारने धडक दिली. इतकेच नाही तर मिश्राने पत्नीवर गाडी चढवण्याचाही प्रयत्न केला. यात मिश्रा याची बायको यास्मिन वाचली असून त्या जखमी झाल्या आहेत. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून मिश्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

kamal kishor mishra car
कमल किशोर मिश्रा कार   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • चित्रपट निर्माता कमल किशोर मिश्रा गाडीमध्ये एका मॉडेलसोबत रोमान्स करत होता
  • जेव्हा पत्नीने त्याला रंगेहाथ पकडले तेव्हा मिश्राने आपल्या पत्नीला कारने धडक दिली.
  • इतकेच नाही तर मिश्राने पत्नीवर गाडी चढवण्याचाही प्रयत्न केला.

Kamal Kishor Mishra : मुंबई : चित्रपट निर्माता कमल किशोर मिश्रा गाडीमध्ये एका मॉडेलसोबत रोमान्स करत होता, जेव्हा पत्नीने त्याला रंगेहाथ पकडले तेव्हा मिश्राने आपल्या पत्नीला कारने धडक दिली. इतकेच नाही तर मिश्राने पत्नीवर गाडी चढवण्याचाही प्रयत्न केला. यात मिश्रा याची बायको यास्मिन वाचली असून त्या जखमी झाल्या आहेत. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून मिश्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (producer kamal kishor mishra hits wife with car after caught with model in mumbai read in marathi) 

अधिक वाचा : Hunger Strike : आमदार कैलास पाटील यांचा उपोषणाचा तिसरा दिवस, मागण्या अजून प्रतिक्षेत

मिळालेल्या माहितीनुसार अंधेरी पश्चिममध्ये १९ ऑक्टोबर रोजी कमल किशोर मिश्रा हा चित्रपट निर्माता आपल्या कारमध्ये एका मॉडेलसोबत रोमान्स करत होता. तेव्हा कमल किशोर मिश्रा याची पत्नी यास्मिन तिकडे दाखल झाली. त्यांनी गाडीच्या काचेवर नॉक करून पतील मिश्राला आपल्याला आताच्या आता बोलायचे आहे म्हणून सांगितले. परंतु मिश्रा गाडीतून बाहेर येत नव्हता. तेव्हा मिश्राने गाडी सुरू केली आणि पत्नी यास्मिनला धडक दिली. या यास्मिन जखमी झाल्या आणि त्या खाली कोसळल्या. त्यानंतर मिश्राने पत्नी यास्मिनवर गाडी चढवण्याचाही प्रयत्न केला. सुदैवाने कुणीतरी यास्मिन यांच्या मदतीसाठी आले आणि त्यांना वाचवले. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. मिश्राच्या पत्नी यास्मिन यांनी आंबोली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि पोलिसांनीही यास्मिन याच्या तक्रारीची दखल घेत कमल कुमार मिश्रा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

 

अधिक वाचा : Cattle Trafficked : खोट्या मृत्यू प्रमाणपत्राच्या साहाय्याने गोशाळा चालकाकडून जनावरांच्या कत्तलीसाठी तस्करी, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश


९ वर्षांपूर्वी झाले होते लग्न 


कमल किशोर मिश्रा याने 'शर्मा जी की लग गई', 'देहाती डिस्को', 'खली बली' या चित्रपटांची निर्मिती केली होती. मिश्रा आणि यास्मिन यांचे ९ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. यास्मिन या टीव्ही अभिनेत्री आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी