'Murder'च्या आधी सायको किलर करतात 'ही' भयंकर कृत्य!

मुंबई
रोहित गोळे
Updated Nov 15, 2022 | 16:02 IST

Shraddha Murder Case: वसईच्या श्रद्धा वालकर हिच्या हत्या प्रकरणानंतर सायको किलरचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. जाणून घेऊयात सायको किलर हत्येआधी नेमकं काय-काय करतात.

psycho killer does these things before murder if shraddha was also recognized then she would not have become a victim
'Murder'च्या आधी सायको किलर करतात 'ही' भयंकर कृत्य!  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • ...तर वसईच्या श्रद्धाचाही वाचला असता जीव
  • सायको किलर कशी करतात खुनाची तयारी?
  • सायको किलर हत्येसाठी रचतात संपूर्ण प्लॅन

Shraddha Murder Case: 29 वर्षीय श्रद्धा वालकरच्या हत्येचा खुलासा झाल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. आफताब, ज्याच्यावर ती प्रेम करत होती, त्यानेच तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. या हत्येमुळे एखादी व्यक्ती क्रूरतेची एवढी पातळी कशी गाठू शकते, याचाच अनेक जण विचार करतायेत. साहजिकच हे सामान्य खुन्याचे काम असू शकत नाही. गुन्ह्याच्या भाषेत आफताबसारख्या लोकांना 'सायको किलर' (Psycho killers ) म्हणतात.

सायको किलर म्हणजे काय?

एका वृत्तसंस्थेने 2016 मध्ये खुन्याच्या मानसशास्त्राचा अभ्यास करताना एक अहवाल प्रसिद्ध केला होता, त्यानुसार सीरियल किलर आणि सायको किलरसारखे लोक एखादी हत्या करण्याआधी अनेक आठवडे आधीच तयारी सुरू करतात.

अधिक वाचा: Shraddha Murder case: क्राईम सीरिज पाहून गर्लफ्रेंडचे 35 तुकडे केले, असं काय आहे या अमेरिकन टीव्ही शोमध्ये? 

असे लोक बहुतेक वेळा डायरी लिहितात, ज्यामध्ये ते घटनेचा प्रत्येक तपशील नमूद करतात, ते त्याबाबतची एक कथा तयार करतात. गुन्हा करताना काय परिधान करायचे याचाही ते विचार करतात. 

जर जर अशा व्यक्तीकडे एखादं शस्त्र असेल तर ते त्यांच्याशी खेळत बसतात; अशा प्रवृत्तीचं लोकं खूप संशोधनही करतात. ते अशा स्वरुपाच्या इतर घटनांबद्दल वाचतात, डॉक्यूमेंट्री आणि व्हिडिओही पाहतात.

जुन्या घटनांची कॉपी करून कट रचणं हा या सगळ्याचा उद्देश असतो. याशिवाय तो व्हिडीओ गेमही खेळतात ज्यामध्ये त्यांना लोकांना शूट करायचे असते.


अधिक वाचा: Viral Crime Story: मेव्हण्याचं केलं अपहरण.. खंडणी म्हणून मागितली वधू...नंतर उघड झालं धक्कादायक रहस्य

या लोकांचा आफताबसारखा कोणताही हेतू असू शकतो किंवा मानसिक तणाव आणि सामाजिक बहिष्कार यासारखे कोणतेही कारण एखाद्याची हत्या करण्यासाठी प्रवृत्त करतं.

भारतातील प्रमुख सायको किलर्सची कहाणी

आपल्या लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची निर्घृण हत्या करणारा आफताब हा पहिलाच माणूस आहे असे नाही. अशी अनेक प्रकरणे आजवर समोर आली आहेत, जिथे काही नराधमांनी अमानुषतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.

देहरादूनमध्ये पत्नीचे 72 तुकडे: 

2010 मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर राजेश गुलाटीने आपली पत्नी अनुपमाची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर सुमारे 2 दिवस त्याने आपल्या पत्नीचा मृतदेह बाथरूममध्येच ठेवला होता. घरात असलेल्या आपल्या मुलांनाही त्याने खुनाचा पत्ता लागू दिला नव्हता. हत्येनंतर त्याने चाकूने पत्नीचे 72 तुकडे केले होते आणि ते तुकडे वेगवेगळ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवलेले. नंतर ते तुकडे त्याने जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिलेले.

मुंबईमध्ये 2008 साली नीरज ग्रोवर हत्याकांडही याच रानटीपणाच्या श्रेणीत येतं... नीरज ग्रोवर एक टीव्ही निर्माता होता ज्याची हत्या झाली. हे संपूर्ण प्रकरण लव्ह ट्रँगलचं होते. अभिनेत्री मारिया सुसाईराजच्या घरी नेव्ही ऑफिसर मॅथ्यूने नीरजची हत्या केली होती आणि त्यानंतर दोघांनी मिळून त्याचे तब्बल 300 तुकडे केले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी