Public holiday on 18th January : १८ जानेवारी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांना सावर्जनिक सुट्टी

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 14, 2022 | 16:00 IST

Public holiday for voters for the local body elections to be held on 18th January 2022 : महाराष्ट्रातील ९५ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, दोन जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच सांगली-मिरज-कुपवाडा महानगरपालिका पोटनिवडणुकांसाठी संबंधित भागांतील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याचा निर्णय झाला आहे.

Public holiday on 18th January
१८ जानेवारी होणाऱ्या निवडणुकांसाठी मतदारांना सुट्टी 
थोडं पण कामाचं
  • १८ जानेवारीला ९५ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, दोन जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका
  • १८ जानेवारीला सांगली-मिरज-कुपवाडा महानगरपालिका पोटनिवडणुका
  • सुट्टी फक्त १८ जानेवारीच्या निवडणुकांमध्ये मतदान करणार असलेल्या पात्र मतदारांनाच

Public holiday for voters for the local body elections to be held on 18th January 2022 : मुंबई : महाराष्ट्रातील ९५ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, दोन जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच सांगली-मिरज-कुपवाडा महानगरपालिका पोटनिवडणुकांसाठी संबंधित भागांतील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याचा निर्णय झाला आहे. सामान्य प्रशासनाच्या या निर्णयानुसार मंगळवार १८ जानेवारी २०२२ रोजी सुट्टी असेल. ही सुट्टी फक्त १८ जानेवारीच्या निवडणुकांमध्ये मतदान करणार असलेल्या पात्र मतदारांनाच दिली जाईल. मतदार मतदानाचा हक्कापासून वंचित राहू नयेत यासाठी ही सुट्टी देण्यात आली आहे.

केंद्र सरकार अथवा राज्य सरकार यांच्या अखत्यारित काम करणारे आणि १८ जानेवारी रोजी मतदान करण्यासाठी पात्र असलेले तसेच महाराष्ट्रातील निमसरकारी संस्था/आस्थापने येथे काम करणारे आणि १८ जानेवारी रोजी मतदान करण्यासाठी पात्र असलेले मतदार यांना सार्वजनिक सुट्टी या श्रेणी अंतर्गत ही सुट्टी मिळेल. सावर्जनिक उपक्रम, बॅंका इत्यादींमध्ये काम करणारे आणि १८ जानेवारी रोजी मतदान करण्यासाठी पात्र असलेले मतदार यांनाही ही सुट्टी लागू आहे.

राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील ९५ नगरपंचायतींकरिता तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी सात पंचायत समित्या आणि सांगली-मिरज-कुपवाडा या एका महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकांकरिता ही सावर्जनिक सुट्टी असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी