Pune Bypoll Election: पुण्यातील पोटनिवडणुका बिनविरोध नाहीच; राज ठाकरेंच्या पत्राला अन् भाजपच्या विनंतीला काँग्रेसचा नकार

मुंबई
भरत जाधव
Updated Feb 06, 2023 | 11:20 IST

Pune Bypoll: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनीही महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना निवडणूक बिनविरोध करावी अशी विंनती केली. परंतु काँग्रेसने आपली या विनंतीला थारा दिला नाहीये. 

Pune Bypoll Election
पुण्यातील पोटनिवडणुका बिनविरोध नाहीच  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पुणे जिल्ह्यातील चिंचवड आणि कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार अ
  • कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली
  • आज कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकासआघाडीकडून अर्ज भरण्यात येणार

Pune Bypoll: पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth Bypoll Election)आणि चिंचवडची पोटनिवडणूक (Chinchwad Bypoll Election)बिनविरोध करावी, अशी भाजपची इच्छा आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्र लिहून या निवडणुका बिनविरोध कराव्यात अशी विनंती केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनीही महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना निवडणूक बिनविरोध करावी अशी विंनती केली. परंतु काँग्रेसने आपली या विनंतीला थारा दिला नाहीये.  (Pune Bypoll Election: Congress rejected Raj Thackeray's letter and BJP's request)

अधिक वाचा  : जलद वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम घरगुती पेय

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेयांनी ट्विट करत भाजप आणि राज ठाकरेंच्या  विंनतीला  नकार दिला आहे. पुणे जिल्ह्यातील चिंचवड आणि कसबा मतदार संघात  विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार असल्याची घोषणा नाना पटोले यांनी ट्विट करत केली आहे. कसबा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्ष आणि चिंचवड मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला आहे, असं नाना पटोले (Nana Patole Tweet)यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  : काय आहेत निद्रानाश होण्याची कारणे

कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची (BJP candidates)घोषणा करण्यात आली आहे. कसबा मतदार संघासाठी हेमंत रासने (Hemant Rasne)आणि चिंचवड मतदार संघासाठी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. नाना पटोले यांच्या ट्विटमुळे (Nana Patole On Pune Bypoll) आता निवडणुकीचा थरार पहायला मिळणार आहे.

अधिक वाचा  : हृदयविकाराच्या झटक्याची 8 लक्षणे प्रत्येक स्त्रीला माहीत असणं आहे आवश्यक

दरम्यान, महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन केली होती. तर राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे पत्राचा कागद दाखवून निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी केली होती. मात्र, महाविकास आघाडीनेही (MVA) निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे.  आज कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकासआघाडीकडून अर्ज भरण्यात येणार आहे.  दरम्यान भाजप   'एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. मी म्हणलं चर्चा करू. काल भाजपची उमेदवारी जाहीर झाली, टिळकांना डावललं गेलं. आता मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावाला अर्थ नाही. पुण्यात पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहतील,' असं नाना पटोले यांनी सांगितलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी