Eknath Shinde: बिहारमधील दुर्घटनेत जखमी मराठमोळ्या कुटुंबाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका फोन कॉलमुळे मदत

Pune family Airlift from Bihar: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका फोन कॉलमुळे बिहारमधील दुर्घटनेत जखमी झालेल्या मराठी कुटुंबाला एअरलिफ्ट करुन मदत करण्यात आली. 

pune family injured in bihar cylinder blast was airlift after CM Eknath Shinde instruction
बिहारमधील दुर्घटनेत जखमी मराठमोळ्या कुटुंबाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका फोन कॉलमुळे मदत 
थोडं पण कामाचं
  • बिहार येथे दुर्घटनेत जखमी झालेल्या मराठी कुटुंबाला विशेष विमान
  • मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी विनाविलंब स्वखर्चातून दोन Air Ambulance बुक केल्या

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या एका फोन कॉलमुळे बिहारमधील मराठमोळ्या कुटुंबाला लाख मोलाचा मदतीचा हात मिळाला आहे. साताऱ्यातील अमोल जाधव (Amol Jadhav Satara) हे सध्या बिहारमधील पाटण्यात (Patana Bihar) आपल्या कुटुंबासह उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास आहेत. शनिवारी मध्यरात्री २ वाजता त्यांच्या राहत्या घरात गॅस गळतीने मोठा स्फोट झाला. या स्फोटात त्यांच्या कुटुंबातील चार जण होरपळले. त्यांना उपचारासाठी तात्काळ बिहारमधील पाटणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी पुणे किंवा मुंबईला हलविण्यास सांगितले.

त्यानंतर या कुटुंबाच्या नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी पुण्याला नेण्याचा निर्णय घेतला आणि Air Ambulance मिळणेसाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी Air Ambulance कंपनीने एका वेळी एकच रुग्ण नेता येईल असे सांगितले. त्यामुळे सदर कुटुंबाचे नातेवाईक हतबल झाले. हवाई वाहतुकीचा होणारा लाखोंचा खर्च कोठून करणार, हा गंभीर प्रश्न समोर ठेवून शनिवारी दिवसभर अश्रू ढाळत होते. 

यावेळी नातेवाईकांनी त्यांच्या भागातील अनेकांकडे मदतीचा हात मागितला पण यश येऊ शकले नाही. हवाई वाहतुकीचा अमाप खर्च असल्याने नातेवाईकांचा मानसिक ताण वाढत चालला होता. त्यावेळी एका नातेवाईकाने सांगलीचे आमदार अनिल बाबर यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क केला. संपर्क झाल्यावर नातेवाईकांनी सर्व हकीकत मुख्यमंत्र्यांना सांगितली. त्यानंतर तात्काळ सूत्रे फिरण्यास सुरुवात झाली. 

हे पण वाचा : MLAच्या चालकाचा प्रताप, टोल कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात

खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी प्रथम आणि नंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना अतितात्काळ, शासकीय Air Ambulance मिळण्यासाठी विनंती केली. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शासकीय Air Ambulance उपलब्ध होऊ शकली नाही. वेळ अतिशय नाजूक असल्याने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी विनाविलंब स्वखर्चातून २ Air Ambulance बुक केल्या आणि त्या कुटुंबाला दिवस उजाडण्याचा आत पुण्यात आणण्याचे आदेश शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना दिले.

विमान दिवस उजेडण्याच्या सुमारास पाहिले विमान दाखल झाले. जखमींपैकी ११ वर्षांच्या मुलास घेऊन आज सकाळी ६ वाजता स्पेशल विमान पुण्यातील लोहगाव विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर जखमी पैकी दुसऱ्या १२ वर्षाच्या बालकास घेऊन दुसरे विशेष विमान सकाळी ११ वाजता विमानतळावर दाखल झाले. दोन्ही जखमी रुग्णांना, शिवसेना वैद्यकीय मदत समन्वयक राजाभाऊ भिलारे व युवराज काकडे यांच्या सहाय्याने पुण्यातील सूर्या सह्याद्री रुग्णालयात दाखल केले असून, येथे चांगल्याप्रकारे उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी