VIDEO: रणजित सावरकरांचा राहुल गांधींना इशारा, माफी मागा अन्यथा...

मुंबई
Updated Dec 16, 2019 | 16:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

48 hrs ultimatum to Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनीही राहुल गांधींना इशारा दिलाय

rahul gandhi apology veer savarkar grandson ranjit savarkar mumbai high court notice ultimatum congress politics news marathi
VIDEO: रणजित सावरकरांचा राहुल गांधींना इशारा, माफी मागा अन्यथा...  |  फोटो सौजन्य: IANS

थोडं पण कामाचं

  • सावरकरांबाबत केलेल्या वकत्व्यानंतर राहुल गांधी अडचणीत 
  • राहुल गांधी यांनी माफी मागावी, भाजपने केली मागणी 
  • रणजित सावरकरांनी राहुल गांधींना ४८ तासांचा दिला अल्टिमेटम

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी दिल्लीत भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख करत भाष्य केलं. 'माझं नाव राहुल गांधी आहे राहुल सावरकर नाही. मी सत्याच्याच बाजूने आणि मरेपर्यंत माफी मागणार नाही' असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले. भाजपने राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी राहुल गांधी यांना इशारा देत ४८ तासांत माफी मागण्यास सांगितलं आहे. 

काय म्हणाले राणजित सावरकर?

राहुल गांधी यांनी यापूर्वीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अवमानना केली आहे आणि त्यासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरोधात मुंबईतील भोईवाडा न्यायालयात फौजदारी दावा दाखल केला आहे. न्यायालायने पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. शनिवारी राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता मी त्यांना नोटीस पाठवत आहे. राहुल गांधी यांनी ४८ तासांत माफी मागावी अन्यथा न्यायालयात दावा दाखल करु.

उद्धव ठाकरेंकडून काय अपेक्षा? 

रणजित सावरकर म्हणाले, उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी काहीतरी यावर निर्णय घ्यावा. माझी मागणी आहे की, उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढा. यानंतर तुमच्याकडे बहुमत राहणार नाही पण सावरकरांच्या सन्मानासाठी काँग्रेस आमदारांना तुम्ही मंत्रिमडळातून काढलं तर निश्चितच तुमचं सरकार न पाडण्यासाठी भाजपवर एक दबाव येईल आणि तुमचं सरकार पाच वर्षे निश्चित चालेल.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

राहुल गांधी यांनी एका जाहीर सभेत भाजपवर टीका करताना म्हटलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाची घोषणा दिली. पण देशात मेक इन इंडिया नाही तर रेप इन इंडिया दिसत आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन शुक्रवारी संसदेत भाजप महिला खासदारांनी आक्रमक होत राहुल गांधी यांनी महिलांची माफी मागावी अशी मागणी केली होती. मात्र, राहुल गांधी यांनी माफी मागण्यास नकार दिला. यानंतर शनिवारी काँग्रेस पक्षाकडून दिल्लीत 'भारत बचाव रॅली'चं आयोजन केलं होतं. या रॅलीत राहुल गांधी यांनी म्हटलं, 'माझं नाव राहुल गांधी आहे राहुल सावरकर नाही. मी सत्याच्याच बाजूने आणि मरेपर्यंत माफी मागणार नाही'. त्यानंतर आता यावरुन राजकीय वातावरण तापत असल्याचं दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी