राहुल गांधींना सावरकर यांच्याबद्दल 'स' माहिती नाही, ते केवळ लिहिलेलं वाचतात : देवेंद्र फडणवीस

मुंबई
सुनिल देसले
Updated Nov 17, 2022 | 14:07 IST

Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

Rahul gandhi do not know anything about savarkar he only read statement said devendra fadnavis
राहुल गांधींना सावरकर यांच्याबद्दल 'स' माहिती नाही, ते केवळ लिहिलेलं वाचतात : देवेंद्र फडणवीस  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • सावरकरांबद्दल काँग्रेस खोटं बोलते - देवेंद्र फडणवीस
  • सावरकरांनी भोगलेले अत्याचार सहन करणारा दुसरा नेता दाखवा - देवेंद्र फडणवीस
  • बाळासाहेब ठाकरेंनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा वारसा चालवला - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis on Rahul Gandhi: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिंदे गटाच्या वतीने एका परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.  

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्यांच्या विचारांचा वारसा आपण सांगतो ते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि वंदनीय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या दोन्ही विचारांना मी मानवंदना अर्पित करतो. 

ज्या प्रकारे अंदमानाच्या कालकोठडीत दुहेरी काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना 11 वर्षे जे अनन्वित अत्याचार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या ठिकाणी सहन केले. अशा प्रकारचे अत्याचार सहन करणारा एक नेता मला दाखवा. अशा प्रकारचे अत्याचार सहन करत असतानाही त्यांच्या मनात कायम स्वातंत्र्यलक्ष्मीचीच पूजा होती आणि त्यांनी स्वातंत्र्यलक्ष्मीचंच गीत गायले, तेच गीत त्याठिकाणी लिहिले. स्वातंत्र्यवीर सावरकर जर त्या अंदमानाच्या कारागृहात गेले नसते तर शेकडो कैद्यांनी आत्महत्या केली असती. शेकडो लोक कदाचित वेडे झाले असते. पण त्या सर्व कैद्यांना बंड करण्याचा धीर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिला असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

म्हणून मला असं वाटतं की, हे जे काही स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत बोलतात... कोणीतरी लिहून देतं ओ... त्या राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा 'स' माहिती नाही. राहुल गांधी केवळ लिहिलेलं वाचतात. सावरकर केवळ तीन-चार वर्षे अंदमानाच्या कारागृहात होते असं म्हणतात. यांना इतकंही माहिती नाही की किती वर्षे ते अंदमानाच्या कारागृहात होते. यांना उत्तर दिलंच पाहिजे आणि योग्य प्रकारे उत्तर दिलं पाहिजे. ते उत्तर आपण देऊ हा विश्सास मी तुम्हाला देतो असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे पण वाचा : जेवणानंतर गुळ खावा की नाही?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांना हे माहिती होतं की, हा देश तोपर्यंत दुर्बल राहिल जोपर्यंत इथला हिंदू समाज आपल्या जाती व्यवस्था, आपलं वर्णभेद हे सर्व संपवून एकत्रित होत नाही. जोपर्यंत इथला हिंदू समाज मजबूत होत नाही. कारण त्यांना इतिहास माहिती होता की, जोपर्यंत या देशातला हिंदू समाज मजबूत होता तो एकत्रित होता जोपर्यंत त्याची विजीगीषू वृत्ती जिवंत होती तोपर्यंत या देशावर कोणाची आक्रमण करण्याची हिंमत नव्हती. अनेक आक्रमण या देशाने परतवून लावली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी