Sanjay Raut: 'राहुल गांधींमुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते', राऊत चिडले

मुंबई
रोहित गोळे
Updated Nov 18, 2022 | 15:46 IST

Sanjay Raut Warned Rahul Gandhi: संजय राऊत यांनी सावरकरांबाबत सातत्याने वादग्रस्त विधानं केली तर महाविकास आघाडीत फूट पडू शकते असा इशाराच संजय राऊत यांनी राहुल गांधींना दिला आहे.

rahul gandhi may cause a split in mahavikas aghadi sanjay raut warned
'राहुल गांधींमुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते', राऊत चिडले 
थोडं पण कामाचं
  • शिवसेना महाविकास आघाडीतून खरंच बाहेर पडणार?
  • राऊतांचा राहुल गांधींना थेट इशारा
  • सावरकरांबद्दल वादग्रस्त बोलू नका, राऊतांनी ठणकावलं

Sanjay Raut: मुंबई: 2019 विधानसभा निवडणुकीनंतर भाजपशी काडीमोड घेऊन शिवसेनेने थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या साथीने सत्ता स्थापन करुन राजकारणातील सर्वात मोठा डाव खेळला होता. शिवसेनेच्या या चालीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्व राजकीय गणितचं बदलली. मात्र, आता शिवसेनाच महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आता ही चर्चा काही आम्ही सुरु केलेली नाही. तर ती सुरु झाली आहे स्वत: संजय राऊतांनी केलेल्या एका विधानामुळे... (rahul gandhi may cause a split in mahavikas aghadi sanjay raut warned)

त्याचं झालं असं की, राहुल गांधींनी सावरकरांविरोधात एक विधान केलं. ज्यामुळे राज्यभरात भाजपने त्यांचा निषेध केला. तर दुसरीकडे शिवसेनेने देखील राहुल गांधींविरोधात भूमिका घेतली आहे. राहुल गांधींमुळे महाविकास आघाडीत फूट पडेल असं स्पष्टपणे संजय राऊत म्हणाले आहेत. 

अधिक वाचा: स्मृतीदिनी NCPला समजाला ठाकरेंच्या हिंदुत्वचा अर्थ; बाळासाहेब ठाकरेंना अजित पवारांनी वाहिली आदरांजली

'महाराष्ट्रात येऊन सावरकरांची बदनामी करणं हे आम्हाला आणि महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनाही मंजूर नाही. इथे येऊन सावरकरांची बदनामी करण्याची गरज नव्हती. राहुल गांधीच्या अशा वक्तव्यांनी महाविकास आघाडीत फूट पडू शकते.' असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं आहे. 

पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला सध्या चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र, त्यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन आता राज्यात बराच गदारोळ झाला आहे. एकीकडे भाजप नेते त्यांच्याविरोधात आक्रमक झालेले असताना दुसरीकडे शिवसेना देखील आता राहुल गांधींना या मुद्द्यावर खडे बोल सुनावत आहे. 

'महाराष्ट्र आणि देशातील लोकांना सावरकरांबद्दल आदर आहे, इतिहासात काय घडलं आणि काय नाही हे चिवडत बसण्यापेक्षा राहुल गांधींनी नवा इतिहास निर्माण करावा.' असा सल्लाही राऊतांनी दिला आहे.

अधिक वाचा: राहुल गांधींमुळे महाविकास आघाडीत बिघाडी! शिवसेना परत भाजपकडे मैत्रीची साद घालणार का?

दुसरीकडे राहुल गांधी हे मात्र आपल्या मतावर ठाम आहेत. त्यांनी याआधीही सावरकरांबाबत अशाप्रकारचं वक्तव्य केलं होतं आणि आता देखील तेच वक्तव्य केलं आहे. 

आता राहुल गांधी हे जर यापुढेही अशीच वादग्रस्त विधानं करत राहिले तर शिवसेना त्यांच्यापासून फारकत घेणार का?, महाविकास आघाडी फुटणार का? असे अनेक नवे सवाल निर्माण झाले आहेत. ज्यामुळे शिवसेना राजकीय पटलावर नवा डावही मांडू शकतो, जे आजच्या घडीला काँग्रेसला अजिबातच परवडणारं नाही, म्हणूनच संजय राऊतांच्या सल्ल्याकडे काँग्रेसला आणि विशेषत: राहुल गांधींना अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी