राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंनी केले हे मोठे काम 

 Maharashtra CM Uddhav Thackeray called meeting:  मंगळवारी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी उद्धव ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला 

rahul gandhi uddhav thackeray maharashtra vikas aghadi meeting
राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंनी केले हे मोठे काम   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  •  कोविड-१९ मुळे महाराष्ट्रात वाईट परिस्थिती, राज्यात सर्वाधिक रुग्ण 
  •  देवेंद्र फडणवीस म्हणाले, संकटाशी योग्य पद्धतीने सामना केला नाही 
  •  राहुल गांधी म्हणाले, राज्य सरकारच्या निर्णयात त्यांचा पक्ष सामील नाही 

मुंबई :  कोविड-१९ शी सामना करण्यास कमी पडल्याचा आरोप सहन करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारची बुधवारी एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये सामील झालेल्या सर्व सहकारी पक्षांना बोलावले आहे. या बैठकीत राज्यात निर्माण झालेल्या कोविड-१९ ची परिस्थिती आणि त्यावरील उपाय योजनांसाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचे समजते आहे. महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात या आजाराच्या विळख्यात आहे. देशात कोविड-१९ चे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. या महामारीत वाढत्या रुग्ण संख्येवर लगाम लावण्यात राज्यातील महाविकास आघाडी  सरकारला अपयश आल्याची टीका भारतीय जनता पक्ष करत आहे. राज्यात कोविड-१९ ची स्थिती खराब झाल्यामुळे सरकार आणि विरोधकांपैकी अनेक नेते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेल्याने राज्यातील राजकारणाला गती आला आहे. भाजप नेते नारायण राणे यांनी राज्यपालांना भेटून राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी केली आहे. 


 महाविकास आघाडीतील बिघाडीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आघाडीच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी ही बैठक होत असून त्यात अनेक मुद्द्यांवर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

 
 मागील काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेली राज्यपालांची भेट, त्यानंतर त्यांच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष सरकारवर नाराज असल्याचं बोललं जात आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल महाराष्ट्रातील कोरोनाच्या स्थितीवर बोलताना अप्रत्यक्षपणे याची कबुली दिली होती. महाराष्ट्रात आमच्या पक्षाचा सरकारला पाठिंबा आहे. पण आम्ही तिथं 'डिसिजन मेकर' नाही, असं त्यांनी म्हटलं होतं.  राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा पक्ष सामील नाही. त्यातून आघाडीतील दुरावा अधिकच उघड झाला होता. आघाडीतील आमदारांच्या फुटीचीही चर्चा सुरू होती. मुख्यमंत्र्यांकडून इतर मंत्र्यांना विश्वासात घेतलं जात नसल्याच्या चर्चाही दबक्या आवाजात सुरू होत्या.

शरद पवार, संजय राऊत आणि बाळासाहेब थोरात या तिन्ही नेत्यांनी सारं काही आलबेल असल्याचा दावा कालच केला होता. असं असतानाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैठक बोलावल्यानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. कोरोनाच्या संकटाबरोबरच सरकारमधील समन्वयावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी