Ambet Bridge : रायगड : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा सावित्री, बाणकोट खाडीवरील आंबेतचा पूल धोकादायक बनला आहे. या पुलाचे दुरुस्तीचे काम सुरु असुन हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलाला पर्याय म्हणुन बोट, रोरो सुविधा देण्यात आली आहे. (raigad ratnagiri district bridge dangerous for vehicle still bike rider using)
अधिक वाचा : Chitra Wagh : संजय राठोड यांचा विषय संपवूया, महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, चित्रा वाघ यांचे एक पाऊल मागे
पुलावरील वाहतुक बंद करण्यासाठी पुलाच्या मार्गावर दगड मातीही टाकण्यात आली आहे. तसेच पुलावर लोखंडी बॅरेगेटींगही करण्यात आले आहे. मात्र येथील ग्रामस्थ जीव धोक्यात घालून या पुलावरून प्रवास करताना दिसत आहेत. अनेक दुचाकीस्वार या पुलावरील लोखंडी बॅरेगेटिंगवरून मार्ग काढून जात आहे. असे असले तरी सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहेत. प्रवाशांनी जेट्टी, बोट आणि रोरोवरून प्रवास करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. परंतु वाहनचालकांनी या आवाहनकाडे दुर्लक्ष करत या धोकादायक पुलावरून प्रवास करत आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.