Railway arrange special trains for those going to Konkan for Holi : होळी अर्थात शिमगा हा सण साजरा करण्यासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकरिता रेल्वे स्पेशल ट्रेन सोडणार आहे. मध्य रेल्वे 34 विशेष गाड्या सोडणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव, विशेष पनवेल-करमाळी या विशेष गाड्यांचे आरक्षण खुले झाले आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव (01459) ही विशेष गाडी 26 फेब्रुवारी, 5, 12 मार्च रोजी धावणार आहे. एलटीटीहून रात्री 10.10 वाजता सुटणार असून मडगावला दुसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात (01460) 26 फेब्रुवारी, 5, 12 मार्चला सकाळी 11.30 वाजता सुटणार आहे. ती त्याच दिवशी रात्री पावणेबारा वाजता मुंबईत दाखल होईल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी येथे थांबणार आहे.
पनवेल-करमाळी (01447) ही विशेष गाडी 25 फेब्रुवारी, 4, 11, 18 मार्चला पनवेल येथून रात्री 10 वाजता सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता करमाळीला पोहोचेल. करमाळी-पनवेल (01448) याच दिवशी सकाळी 9.20 वाजता सुटणार असून पनवेलमध्ये रात्री सव्वाआठला पोहोचेल. थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा येथे ही गाडी थांबणार आहे. पुणे जं.-करमाळी-पुणे दरम्यान विशेष ट्रेन (1445 / 01446) चालविण्यात येणार आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण खुले झाले आहे.
चाळीशीनंतर स्टॅमिनासाठी पुरुषांनी खायचे पदार्थ
कच्ची पपई खा आणि अनेक आजारांपासून लांब राहा
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.