Railway journey from Karjat to Mumbai via Panvel : मुंबई : कर्जत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात मुंबई सीएसएमटी (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Mumbai - Mumbai CSMT) हा रेल्वे (Local or Train or Railway) प्रवास पनवेल मार्गे करता येणार आहे. यामुळे कर्जतमधून थेट मुंबई सीएसएमटी येथे पोहोचण्यासाठी लागणारा वेळ किमान अर्ध्या तासाने कमी होईल. कर्जत ते मुंबई सीएसएमटी व्हाया पनवेल या प्रवासाकरिता पनवेल ते कर्जत असा नवा रेल्वे मार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. हा मार्ग २९.६ किमी अंतराचा आहे.
तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये झाला हा मोठा बदल...
सध्या कर्जत ते मुंबई सीएसएमटी हा प्रवास धीम्या गाडीने (Slow Train) करण्यासाठी २ तास १९ मिनिटे लागतात. कर्जत ते मुंबई सीएसएमटी व्हाया पनवेल हा मार्ग सुरू झाल्यावर धीम्या गाडीने कर्जतहून सीएसएमटीपर्यंतचा प्रवास १ तास ५० मिनिटांचा होईल. साधारण अर्ध्या तासाची बचत होईल.
कर्जत ते मुंबई सीएसएमटी व्हाया पनवेल हा मार्ग मुंबई रेल्वे विकास महामंडळ तयार करणार आहे. प्रकल्पासाठी २ हजार ७८३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. प्रकल्पासाठी जमीन सपाटीकरण सुरू आहे.
सध्या पनवेल आणि कर्जत यांना जोडणारा रेल्वे मार्ग एकेरी आहे. हा मार्ग खालापूर आणि कर्जत तालुक्यातून जातो. निवडक मालगाड्या आणि मोजक्या लांब पल्ल्याच्या गाड्या यांच्यासाठीच हा मार्ग वापरला जातो. आता हा मार्ग दुपदरी केला जाईल. नवा मार्ग जुन्या मार्गाला समांतर बांधला जाईल पण काही ठिकाणी मार्गात थोडा बदल असेल. सध्याच्या मार्गावर दोन बोगदे आहेत पण नव्या मार्गावर तीन बोगदे असतील. नधालजवळ २२० मीटरचा एक बोगदा असेल. दुसरा बोगदा २६०० मीटर लांबीचा असेल. तर तिसरा बोगदा वावराळे आणि कर्जत यांच्या दरम्यान असेल.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.