Railway Megablock : रेल्वे प्रवासाला निघण्याआधी हे वाचा, आज नव्या वर्षातला पहिला मेगाब्लॉक

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 01, 2023 | 08:10 IST

railway megablock on sunday 1st january 2023 on central harbour and transharbour line : रेल्वे प्रवासाला निघणार असाल तर आधी ही बातमी वाचा. आज (रविवार 1 जानेवारी 2023) मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर (Mumbai Suburban Railway) नव्या वर्षातला पहिला मेगाब्लॉक (Megablock) आहे.

railway megablock
रेल्वेचा आज नव्या वर्षातला पहिला मेगाब्लॉक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • रेल्वे प्रवासाला निघण्याआधी हे वाचा
  • आज नव्या वर्षातला पहिला मेगाब्लॉक
  • प्रवाशांनी मेगाब्लॉकची माहिती जाणून घेऊन त्यांच्या प्रवासाचे नियोजन करणे हिताचे

railway megablock on sunday 1st january 2023 on central harbour and transharbour line : रेल्वे प्रवासाला निघणार असाल तर आधी ही बातमी वाचा. आज (रविवार 1 जानेवारी 2023) मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर (Mumbai Suburban Railway) नव्या वर्षातला पहिला मेगाब्लॉक (Megablock) आहे. प्रवाशांनी मेगाब्लॉकची माहिती जाणून घेऊन त्यांच्या प्रवासाचे नियोजन करणे हिताचे होईल.

मध्य रेल्वे मार्ग

माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन स्लो लाईनवर सकाळी 11 वाजून 5 मिनिटे ते दुपारी 3 वाजून 55 मिनिटे मेगाब्लॉक आहे. या काळात स्लो लाईनवरील रेल्वे वाहतूक अप आणि डाऊन फास्ट लाईनवर वळवण्यात येणार आहे. फास्ट लाईनवर वळवलेल्या अप आणि डाऊनच्या स्लो ट्रेन सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्टेशनांवर थांबणार आहेत.

हार्बर रेल्वे मार्ग

पनवेल ते वाशी अप आणि डाऊन लाईनवर सकाळी 11 वाजून 5 मिनिटे ते संध्याकाळी 4 वाजून 5 मिनिटे मेगाब्लॉक आहे. या काळात मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Mumbai - Mumbai CSMT or CSMT Mumbai) ते वाशी या मार्गावर विशेष गाड्या धावतील. 

ट्रान्सहार्बर रेल्वे मार्ग

जुईनगर ते पनवेल अप आणि डाऊन लाईनवर सकाळी 11 वाजून 5 मिनिटे ते संध्याकाळी 4 वाजून 5 मिनिटे मेगाब्लॉक आहे. ठाणे ते वाशी रेल्वे वाहतूक वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहे.

उरण रेल्वे मार्ग

मेगाब्लॉक नाही

पश्चिम रेल्वे मार्ग

मेगाब्लॉक नाही

Pausha Putrada Ekadashi 2023 : कधी आहे 2023 मधील पहिली एकादशी?

Pausha Putrada Ekadashi Vrat Kataha: पुत्रदा एकादशी 2023; जाणून घ्या व्रत कथा, शुभ मुहूर्त, पूजा विधी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी