Mumbai Local: मुंबई लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकारच्या प्रस्तावावर रेल्वेने म्हटलं...

Mumbai local trains: मुंबई लोकलची सेवा सर्वसामान्य नागरिकांना सुरू करण्याच्या संदर्भात राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला आपला प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावावर आता मध्य रेल्वेकडून प्रतिक्रिया आली आहे.

Mumbai Local Train
मुंबई लोकल (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई : मिशन बिगिन अगेन (Mission Bigin Again) अंतर्गत राज्य सरकार (Maharashtra Government)कडून हळूहळू सर्व सेवा पूर्ववत करण्यात येत आहेत. मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनची सेवा (Mumbai Local train service) यापूर्वी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी होती त्यानंतर महिलांनाही रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली. आता राज्य सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांसाठीही लोकलची सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारकडून रेल्वे विभागाला नियोजित वेळेनुसार सर्वसामान्यांना प्रवास करण्यात यावा यासाठी एक प्रस्ताव सादर (State government proposal) करण्यात आला. राज्य सरकारच्या या प्रस्तावानंतर आता रेल्वे प्रशासनाकडून प्रतिक्रिया आली आहे.

राज्य सरकारच्या प्रस्तावावर मध्य रेल्वेने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये मध्य रेल्वेने म्हटलं आहे, "सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करुन मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्यास आम्ही नेहमीच तयार आहोत. या संदर्भात राज्य सरकारसोबत चर्चा करत असून त्यांच्यासोबत सल्लामसलत केल्यानंतर अतिरिक्त सेवा पुरवण्यात येईल."

राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक गोष्टींना सूट देण्यात आली आहे. ऑफिसेस, कंपन्या, कार्यालये सुरू झाल्याने नागरिकांना आपले कार्यालय गाठण्यासाठी तासंतास बसमधून प्रवास करावा लागत आहे. हेच लक्षात घेत आणि कोविड-१९च्या नियमांचे पालन करुन लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी कशी सुरू करता येईल त्यासंदर्भात राज्य सरकारने ठराविक वेळनुसार नियोजन करण्याचा प्रस्ताव रेल्वे विभागाला सादर केला आहे. 

असा आहे राज्य सरकारचा प्रस्ताव 

  1. सर्वसामान्य नागरिकांना पास किंवा तिकीटावर पहाटे पहिली लोकल ते सकाळी ७.३० वाजेपर्यंत प्रवासाची मुभा
  2. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी क्यूआर कोड, पास, आयकार्डसह तिकीट सकाळी ८ ते सकाळी १०.३० वाजेपर्यंत प्रवासाची 
  3. सर्वसामान्य नागरिकांना सकाळी ११ ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत पास किंवा तिकीटावर प्रवास 
  4. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना संध्याकाळी ५ ते संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत प्रवास 
  5. सर्वसामान्य नागरिकांना रात्री ८ ते रात्री शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करण्याची मागणी 
  6. लेडीज स्पेशल ट्रेन प्रत्येक तासाला एक

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी