Rain at 'these' places in Maharashtra, predicts the Meteorological Department : महाराष्ट्रात सोमवार 13 मार्च 2023 ते शुक्रवार 17 मार्च 2023 या पाच दिवसांच्या काळात पावसाची शक्यता आहे. हा अंदाज हवामान खात्याने अर्थात वेधशाळेने व्यक्त केला आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सोमवार 13 मार्च 2023 ते शुक्रवार 17 मार्च 2023 या पाच दिवसांच्या काळात पावसाची शक्यता आहे.
राज्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह विजा आणि तुरळक पावसाचा अंदाज आहे. पावसाची तीव्रता बुधवार 15 मार्च 2023 ते शुक्रवार 17 मार्च 2023 या तीन दिवसांच्या काळात वाढण्याची शक्यता आहे. पावसामुळे कमाल तापमात दोन अंशांची घट होईल असाही अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मध्य प्रदेश ते उत्तर प्रदेशपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तसेच अरबी समुद्रातून खेचल्या जाणाऱ्या आर्द्रतेमुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
शहर/जिल्हा | कमाल तापमान अंश से. मध्ये | किमान तापमान अंश से. मध्ये |
मुंबई | 39 | 23 |
नाशिक | 33 | 16 |
रत्नागिरी | 37 | 22 |
कोल्हापूर | 35 | 20 |
सोलापूर | 37 | 21 |
पुणे | 35 | 21 |
छत्रपती संभाजीनगर | 35 | 15 |
अमरावती | 36 | 19 |
नागपूर | 35 | 17 |
Rangpanchami : रंगपंचमी या सणाविषयी हे माहिती आहे का?
Yashwantrao Chavhan Speech : यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त करा हे मराठी भाषण
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.