मुंबईत पावसाचा शिडकावा

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 17, 2021 | 21:33 IST

Rain in Mumbai उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना संध्याकाळी पावसाच्या शिडकाव्याने दिलासा मिळाला. मुंबईत अनेक ठिकाणी संध्याकाळी पाच ते सहा दरम्यान पावसाने हजेरी लावली. पावसाच्या हजेरीने मुंबईचा पारा थोडा घसरला.

Rain in Mumbai
मुंबईत पावसाचा शिडकावा 
थोडं पण कामाचं
  • मुंबईत पावसाचा शिडकावा
  • संध्याकाळी पाच ते सहा दरम्यान पावसाने हजेरी लावली
  • मुंबईचा पारा थोडा घसरला

Rain in Mumbai । मुंबईः उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना संध्याकाळी पावसाच्या शिडकाव्याने दिलासा मिळाला. मुंबईत अनेक ठिकाणी संध्याकाळी पाच ते सहा दरम्यान पावसाने हजेरी लावली. पावसाच्या हजेरीने मुंबईचा पारा थोडा घसरला. याआधी बुधवारी दुपारी मुंबईचे कमाल तापमान ३४.५ अंश से. होते. मुंबईचे कमाल तापमान गुरुवारी ३६ अंश से. असेल. 

हवामान खात्याने बुधवारी मुंबईत पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. दिवसभर मुंबईचे वातावरण ढगाळ होते. अखेर संध्याकाळी पाऊस पडला. दक्षिण मुंबई तसेच मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. 

मुंबईसाठी पावसाचा अंदाज

  1. गुरुवार १८ नोव्हेंबर २०२१ - कमाल तापमान ३६ अंश से. आणि किमान तापमान २५ अंश से., दिवसभर ढगाळ वातावरण राहील आणि संध्याकाळी किंवा रात्री मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता
  2. शुक्रवार १९ नोव्हेंबर २०२१ - कमाल तापमान ३४ अंश से. आणि किमान तापमान २४ अंश से., दिवसभर ढगाळ वातावरण राहील आणि अधूनमधून मेघगर्जना होईल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी