शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी केली अटक, पॉर्न फिल्म बनवत असल्याचा आरोप

मुंबई
विजय तावडे
Updated Jul 20, 2021 | 00:18 IST

Raj Kundra : क्राईम ब्रॅचने राज कुंद्राला काही अॅपच्या माध्यमातून पॉर्नोग्राफिक फिल्म बनवण्यासाठी आणि त्या प्रदर्शित करण्यासाठी अटक केली आहे. राज कुंद्रा हे प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आहेत.

Businessman Raj Kundra arrested
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अटक 
थोडं पण कामाचं
  • राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅचने केली अटक
  • काही अॅपच्या माध्यमातून पॉर्न फिल्म बनवत असल्याचा आणि त्या प्रदर्शित करत असल्याचा आरोप
  • पोलिसांकडे सबळ पुरावा असल्याची मुंबई पोलिस आयुक्तांची माहिती

मुंबई: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai crime branch)सोमवारी (१९ जुलै) रात्री उशीरा व्यावसायिक राज कुंद्रा यांना अटक केली आहे. राज कुंद्रा (Raj Kundra) हे प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे (Actor Shilpa Shetty) पती आहेत. राज कुंद्रा (Raj Kundra arrested in Pornography case)) यांना पॉर्नोग्राफीच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. क्राईम ब्रॅचने राज कुंद्राला काही अॅपच्या माध्यमातून पॉर्नोग्राफिक फिल्म बनवण्यासाठी (Production of Porn Films) आणि त्या प्रदर्शित करण्यासाठी अटक केली आहे. राज कुंद्राच्या अटकेविषयी माहिती देताना मुंबई पोलिस आयुक्तांनी (Mumbai Police Commissioner) म्हटले आहे की 'या पॉर्नग्राफिक फिल्मच्या रॅकेटचा तो मुख्य सूत्रधार असल्याची माहिती येते आहे. आमच्याकडे यासंदर्भात पुरेसा पुरावा आहे.' (Actor Shilpa Shetty's Husband Raj Kundra is arrested by Crime Branch of Mumbai Police in Pron Films Case)

फेब्रुवारीमध्ये क्राईम ब्रॅंचकडे नोंदवण्यात आली होती तक्रार

'फेब्रुवारी २०२१ मध्ये मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅचकडे एक तक्रार नोंदवण्यात आली होती. ही तक्रार पॉर्नोग्राफिक फिल्म्सची निर्मिती करण्याचा आणि त्या काही अॅपच्या माध्यमातून प्रदर्शित करत असल्यासंदर्भातील ही तक्रार होती. आम्ही राज कुंद्राला या प्रकरणात १९ जुलै २०२१ला अटक केली आहे. तो या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे दिसून येते आहे. आमच्याकडे यासंदर्भातील पुरेसा पुरावा आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे,' अशी माहिती मुंबई पोलिस आयुक्तांकडून देण्यात आली आहे.

राज कुंद्राचा जामीन मिळवण्याचा प्रयत्न

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचकडे पुरेसा पुरावा असला तरी ते या प्रकरणात पुढील तपास करत आहेत. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याने मात्र आपण काहीही चुकीचे केले नसल्याचे म्हटले आहे. राज कुंद्राने या प्रकरणात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला आहे.

अटक करण्यापूर्वी राज कुंद्राच्या घरीच चौकशी

राज कुंद्राला अटक करण्यापूर्वी क्राइम ब्रॅंचची टीम आज (१९ जुलै) त्याच्या घरीदेखील गेली होती. तिथेही राज कुंद्राची चौकशी करण्यात आली होती. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा चर्चेत येण्याची किंवा वादात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हे. मागील महिन्यात मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे हिने मुंबई उच्च न्यायालयात राज कुंद्रा आणि त्याच्या सहकाऱ्याविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर राज कुंद्राने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावेळेस देखील राज कुंद्रा चर्चेत आला होता.

पॉर्न फिल्मस बनवणाऱ्यांशी राज कुंद्राचे कनेक्शन

सायबर पोलिसांनी आयपीसीच्या कलम २९२, कलम ६७, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६७ अ आणि महिलांचे असभ्य सादरीकरण नियम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात मागील वर्षी अनेकांना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्यांपैकी काही जणांचा संबंध राज कुंद्राशी आढळून आला असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. राज कुंद्राने मात्र त्याच्याविरोधातील सर्व आरोप फेटाळले आहेत. या सर्व प्रकरणाशी आपले काहीही देणेघेणे नसल्याचे त्याने म्हटले आहे. ज्या कंपनीवर पॉर्न फिल्मची निर्मिती करण्याचा आरोप आहे ती कंपनी आपण सोडली असल्याचेही त्याने म्हटले आहे. त्याने ही कंपनी सोडली असल्याचे दाखवणारी काही कागदपत्रेदेखील पोलिसांसमोर सादर केल्याचे सांगण्यात येते आहे.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचा संसार

शिल्पा शेट्टीने राज कुंद्राशी २००९ मध्ये लग्न केले होते. त्यानंतर २०१२ मध्ये या दांपत्याला त्यांचा पहिला मुलगा झाला होता. त्याचे नाव विआन असे ठेवण्यात आले होते. मागील वर्षीच शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना दुसरे अपत्य म्हणजे मुलगी झाली आहे. मुलीचे नाव समिशा असून तिचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे. राज कुंद्रा हा जे एल स्ट्रीम नावाच्या अॅपचा मालक आहे. याशिवाय राज कुंद्राकडे इंडियन प्रिमियल लिगच्या राजस्थान रॉयल्सच्या क्रिकेट टीमची देखील मालकी होती. २०१३ मध्ये दिल्ली पोलिसांनी राज कुंद्राची भारतीय क्रिकेटमधील बेटिंग आणि स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चौकशीदेखील केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी