Raj Thackeray : भोंग्यांसाठी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे यांची दांडी, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे उपमुख्यंत्री अजित पवार यांचे आवाहन

मशींदींवरील भोंगे उतरवा अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली होती. त्यानंतर राज्यात एकच वाद निर्माण झाला होता. राज्यात कायदा सुव्यवस्था रहावी आणि धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरवर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला खुद्द राज ठाकरे यांनी दांडी मारली.

mantralayan meeting
सर्वपक्षीय बैठक   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मशींदींवरील भोंगे उतरवा अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली होती.
  • त्यानंतर राज्यात एकच वाद निर्माण झाला होता.
  • राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला खुद्द राज ठाकरे यांनी दांडी मारली.

मशींदींवरील भोंगे उतरवा अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली होती. त्यानंतर राज्यात एकच वाद निर्माण झाला होता. राज्यात कायदा सुव्यवस्था रहावी आणि धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरवर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला खुद्द राज ठाकरे यांनी दांडी मारली. या सर्वपक्षीय बैठकीत मनसेकडून बाळा नांदगावकार, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. (raj thackeray absent in all party meeting over loudspeaker and law and order situation in maharashtra)

राज्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीला सर्वपक्षीय बैठक पार पाडली या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अनिल परब, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, बहुजन‍‍ विकास आघाडी पक्षाचे हितेंद्र ठाकूर, लोकभारती पक्षाचे आमदार कपिल पाटील, आमदार प्रणिती शिंदे, आमदार क्षितीज ठाकूर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, समाजवादी पक्षाचे रईस पठाण, एमआयएमचे वारिस पठाण, वंचित बहुजन पक्षाच्या रेखा ठाकूर, आम आदमी पक्षाच्या प्रिती मेनन, मार्स्कवादी कम्युनिस्ट पक्षाचे उदय नारकर, आरपीआय (गवई गट) राजेंद्र गवई आदींसह विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


कायदा सर्वांसाठी समान – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, ध्वनीक्षेपाबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्व राज्यांसाठी सारखाच बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधारे राज्य शासनाने जुलै 2017पर्यंत वेळोवेळी शासननिर्णय जारी केले आहेत. त्या शासन निर्णयांची अंमलबजावणी सुरु आहे. राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे ही गृहविभागाची प्राथमिकता आहे. समाजात तेढ वाढेल, कायदा-सुव्यवस्था बिघडेल, अशी वक्तव्ये कुणी करु नयेत. कायदा सर्वांसाठी समान असून आहे, कुणीही कायद्याचा भंग करु नये. आजच्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांची मते जाणून घेण्यात आली आहेत. ती विचारात घेऊन राज्य शासन योग्य तो निर्णय घेईल. शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी, राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.  बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी मनोगते व्यक्त केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी