Raj Thackeray Ayodya Visit: अयोध्या दौरा तूर्तास स्थगित! पुण्यात सविस्तर बोलू राज ठाकरेंचं ट्विट

मुंबई
भरत जाधव
Updated May 20, 2022 | 10:55 IST

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष (President) राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर स्थगित झाला आहे. आज सकाळपासून अयोध्या (Ayodhya) दौरा रद्द होणार असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर राज ठाकरे यांनी स्वत: ट्विट करत तूर्तास अयोध्या दौरा स्थगित करत असल्याचे स्पष्ट केले. दौरा रद्द करण्यामागील कारण राज ठाकरे यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. 

Raj Thackeray's Ayodhya tour postponed
हनुमान चालिसा म्हणाणाऱ्या राज ठाकरेंना रामलल्ला दर्शन देईना   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राज ठाकरे यांच्या पायाला झालेल्या दुखापतीचा त्रास वाढला.
  • अयोध्या दौऱ्याची नवी तारीख जाहीर केली जाणार
  • पुण्याच्या गणेश कला क्रीडा केंद्राच्या सभागृहात रविवारी सभा होणार

मुंबई: अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष (President) राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर स्थगित झाला आहे. आज सकाळपासून अयोध्या (Ayodhya) दौरा रद्द होणार असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर राज ठाकरे यांनी स्वत: ट्विट करत तूर्तास अयोध्या दौरा स्थगित करत असल्याचे स्पष्ट केले. दौरा रद्द करण्यामागील कारण राज ठाकरे यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. 

दरम्यान, राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर आता प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करत आपला दौरा स्थगित करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. परंतु 22 मे रोजी मात्र पुण्यात सभा होणार असून त्यात यावर आपण सविस्तर बोलणार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलयं. पुण्याच्या गणेश कला क्रीडा केंद्राच्या सभागृहात रविवारी सकाळी १० वाजता राज ठाकरे यांची सभा होणार आहे. यावेळी राज ठाकरे काय बोलतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मनसैनिकांकडून अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारीही सुरु झाली होती. अशातच उत्तर प्रदेशमधून मात्र राज यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध करण्यात आला होता. तरीदेखील राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्यावर ठाम होते. परंतु, आता मात्र, राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी ट्वीट करून अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा केली. मात्र, त्याचवेळी या मुद्यावर सविस्तरपणे बोलण्यासाठी पुण्यातील सभेत येण्याचे आवाहन राज यांनी मनसे कार्यकर्त्यांना केले आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या अयोध्या दौऱ्यावर ठाम आहेत. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव हा दौरा स्थगित करण्यात आला आहे. दौऱ्याची पुढील तारीख ही लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे. 5 जूनच्या अयोध्या दौऱ्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं, "तूर्तास अयोध्या दौरा स्थगित... महाराष्ट्र सैनिकांनो, या! यावर सविस्तर बोलूच... रविवार दि. 22 मे, सकाळी 10 वा. स्थळ - गणेश कला क्रीडा केंद्र, पुणे" सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या पायाला झालेल्या दुखापतीचा त्रास गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे हे पुणे दौरा अर्धवट दौरा सोडून मुंबईत आले. डॉक्टरांकडून राज ठाकरे यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, ही शस्त्रक्रिया कधी करायची याबाबत निर्णय राज ठाकरे घेत आहेत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी