Ketaki Chitale : केतकी चितळेच्या वादात राज ठाकरेंची उडी, शरद पवारांची बाजू घेत सुनावले खडे बोल

ketaki chitale शरद पवार यांची नरक वाट पाहत आहे, सतरा वेळा लाळ गळे अशा शब्दांत केतकी चितळे हिने एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. संपूर्ण राज्यात या पोस्टवरून वाद निर्माण झाला असून केतकीवर चौफेर टीका केली आहे. आता राज ठाकरे यांनीही या वादात उडी घेतली असून या पोस्टचा निषेध नोंदवला आहे.

Raj Thackeray and ketaki chitale
केतकी चितळे आणि राज ठाकरे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शरद पवार यांची नरक वाट पाहत आहे, सतरा वेळा लाळ गळे अशा शब्दांत केतकी चितळे हिने एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.
  • संपूर्ण राज्यात या पोस्टवरून वाद निर्माण झाला असून केतकीवर चौफेर टीका केली आहे.
  • आता राज ठाकरे यांनीही या वादात उडी घेतली असून या पोस्टचा निषेध नोंदवला आहे.

Ketaki Chitale : मुंबई : शरद पवार यांची नरक वाट पाहत आहे, सतरा वेळा लाळ गळे अशा शब्दांत केतकी चितळे हिने एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. संपूर्ण राज्यात या पोस्टवरून वाद निर्माण झाला असून केतकीवर चौफेर टीका केली आहे. आता राज ठाकरे यांनीही या वादात उडी घेतली असून या पोस्टचा निषेध नोंदवला आहे. तसेच शरद पवार यांच्याशी जरी आपले मतभेद असले तरी विचारांची लढाई विचाराने लढली पाहिजे, राज्य सरकारने याचा छडा घेऊन कारवाई करावी असे आवाहनही राज ठाकरे यांनी केला आहे. 

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जातीवाद वाढला अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. तसेच शरद पवार जातीयवादी असून त्यांना हिंदू शब्दाचा तिटकारा आहे असेही राज ठाकरे म्हणाले होते. काल केतकी चितळे या अभिनेत्रीने शरद पवार यांच्यावर वाईट शब्दांत टीका करून एक फेसबुक पोस्ट केली होती. 
तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll

 

तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे...

Posted by Ketaki Chitale on Friday, May 13, 2022


या पोस्टखाली केतकीने ऍडव्होकेट नितीन भावे याचेही नाव लिहिले होते. त्यावरून राष्ट्रवादीसह शिवसेना नेत्यांनी केतकीवर टीका केली आहे. ठाण्यात केतकीविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. आता राज ठाकरे यांनीही केतकीला खडे बोल सुनावले आहे. एक पोस्ट जारी करून राज ठाकरे यांनी केतकी चितळेचा समाचार घेतला आहे. राज ठाकरे यांनी म्हटले आहे की,  कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरूध्द तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुध्दीही आपण ओळखतो.. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत..! आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि रहातील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे.असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे असे राज ठाकरे म्हणाले. 

तसेच चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरूषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवंतानी आपल्याला शिकवलं! कोणीही ह्या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा! पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती ह्या खरंच आहेत की नवा वाद उकरून काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरू आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे! कारण ह्या अशाच चार-दोन विकृत टाळक्यांमुळे समाजा- समाजामध्ये तेढ निर्माण होते, समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे आता राज्यकर्त्यांनाही समजलं असेलच.हे सगळं महाराष्ट्रात वेळीच आवरणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनच, राज्यसरकारनं ह्याचा नीट छडा लावून ह्या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा असे आवाहनही राज ठाकरे यांनी राज्य सरकारला केले आहे.

आधी सत्कार मग कोण केतकी चितळे? राज ठाकरे

हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असे म्हटल्यानंतर केतकी चितळे सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. तिला अनेक युजर्सनी अश्लाघ्य भाषेत शिव्या दिल्या होत्या. त्यानंतर केतकीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. महिलांच्या दबलेल्या आवाजाला वाट दिल्याबद्दल राज ठाकरे यांनी आपले कौतुक केल्याचे केतकीने म्हटले होते. केतकीला फीट येण्याचा आजार आहे, या आजाराबद्दल ती जनजागृती करत असून त्याचा एक बँडही केतकीने राज ठाकरे यांना बांधला होता. या वेळी मनसे नेत्या शालीनी ठाकरेही उपस्थित होत्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी