राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका, 'युतीत इतकी वर्षे सडली आणि आमची...'

मुंबई
सुनिल देसले
Updated Oct 10, 2019 | 22:14 IST

Raj Thackeray Rally: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईत दोन जाहीर सभा घेतल्या. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत भाषण केलं आहे. 

Raj Thackeray
राज ठाकरे (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

 • राज ठाकरेंची मुंबईत धडाडली तोफ
 • आपल्या खास शैलीत राज ठाकरेंची शिवसेना-भाजपवर टीका
 • पाहा काय म्हणाले राज ठाकरे...

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या प्रचारसभेला सुरुवात केली आहे. राज ठाकरेंच्या मुंबईतील सांताक्रुझ आणि गोरेगाव येथे जाहीर सभा घेत आपल्या खास शैलीत शिवसेना-भाजपवर टीका केली आहे.

एवढी वर्षे सत्तेत सडली आणि आमची...

शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुखांनी आरोळी दिली होती की आमचे मंत्री राजीनामा देतील, आमची एवढी वर्षे सत्तेत सडली आणि आमची १२४ जागांवर अडली असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. राज ठाकरेंनी पुढे म्हटलं, ह्या लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका. सरकारला वठणीवर आणायला सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे आणि त्यासाठी मी तुमच्या समोर आलो आहे.

मुख्यमंत्र्यांना टोला

सरकार म्हणतं की आम्ही १ लाख २५ हजार विहिरी बांधल्या. मला सांगा मुंबईतील रस्त्यांवर जे खड्डे पडले आहे त्या खड्ड्यांना मुख्यमंत्री विहिरी म्हणत आहेत का? आणि आता पुन्हा नव्या गोष्टी घेऊन हे सत्ताधारी तुमच्यासमोर येत आहेत असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. 

राज ठाकरेंच्या गोरेगावमधील सभेतील महत्वाचे मुद्दे

 1. २०१४ विधानसभेच्या निवडणुकीला राज्याचा विकास आराखडा आणला. असं करणारा मनसे देशातील एकमेव पक्ष आहे.
 2. ईडीची चौकशी लावा, काही करा माझं तोंड बंद होणार नाही
 3. आरेमधील २७०० झाडं कापली आणि आता न्यायालयही सरकारला साजेसं निर्णय देतं
 4. पर्यावरण मंत्री शिवसेनेचे तरीही आरेतील वृक्षतोड थांबवू शकले नाहीत आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणतात आम्हाला सत्ता द्या आरेला जंगल घोषित करु
 5. उद्योगधंदे बंद होत आहेत, बँका बुडत आहेत, बेरोजगारांना काम मिळत नाही आणि सरकार थंड आहे
 6. जाहीरनामे येणार आणि जाणार, तुम्ही भूलथापंना बळी पडणार, तुमच्या मनात राग आहे का नाही? 
 7. सक्षम आणि प्रबळ विरोधी पक्ष नसेल तर सत्ताधारी पक्ष तुम्हाला हवं तसं चिरडून टाकेल
 8. मुंबई, ठाण्यात वाट्टेल ती लोकं येऊन राहत आहेत. ही लोक कुठून येत आहेत आणि काय करत आहेत याचा सरकारला पत्ता नाही
 9. आता महाराष्ट्राच्या निवडणुकीत काश्मीरमधल्या ३७० कलमबद्दल बोलत आहेत. काश्मीरमधूल कलम ३७० काढल्याबद्दल अभिनंदन पण ह्याचा आमच्या राज्याच्या निवडणुकीशी काय संबंध? आमच्या प्रश्नांविषयी कधी बोलणार?
 10. बुलेट ट्रेनसाठी आदिवासींच्या जमिनी घेतल्या जात आहेत, ह्या बुलेट ट्रेनचा कोणाला उपयोग आहे? संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची जखम पुन्हा जिवंत करायचा हा प्रयत्न आहे का?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी