राज ठाकरेंची तब्बल साडे आठ तास ईडीकडून चौकशी

मुंबई
रोहित गोळे
Updated Aug 23, 2019 | 00:08 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने चौकशीसाठी बोलवलं होतं. राज ठाकरे ईडीच्या कार्यलयात गुरुवारी दाखल झाले आणि त्यांची तब्बल साडे आठ तास ईडीने चौकशी केली आहे.

Raj Thackeray_Twitter
राज ठाकरे सहकुटुंब ईडीच्या कार्यालयात  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • राज ठाकरेंची ईडीकडून गुरुवारी चौकशी करण्यात आली
  • राज ठाकरेंना ईडीने कोहिनूर मिल प्रकरणी बजावली आहे नोटीस
  • मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज (२२ ऑगस्ट) कोहिनूर मिल प्रकरणी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आणि ईडीच्या अधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची तब्बल साडे आठ तास चर्चा केली आहे.

राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी पोहोचण्यापूर्वी मुंबईत जोरदार घडमोडी सुरु घडत होत्या. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरु करण्यात आली होती. काही वेळापूर्वीच मनसेचे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावल्यापासून मनसे कार्यकर्ते फारच आक्रमक झाल्याचं दिसून आहे. त्यातच आता मनसे कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेला धक्का लावू नये यासाठी त्यांना ताब्यात घेत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. 

राज ठाकरे यांना आज फोर्ट परिसरातील ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. त्यामुळे या परिसरात मनसैनिक मोठ्या प्रमाणात गर्दी करण्याची शक्यता लक्षात घेऊन येथे बराच फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दरम्यान, कालच मुंबई पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकऱ्यांना कलम १४९ नुसार नोटीस बजावली होती. राज ठाकरे यांच्या चौकशीदरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत पोलिसांनी यावेळी दिले होते. 


UPDATE: 

  1. कितीही चौकश्या होऊ द्या पण मी तोंड बंद ठेवणार नाही - राज ठाकरे
  2. गरज पडल्यास पुढील काळात त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली
  3. राज ठाकरेंनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली
  4. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य केले
  5. आता यानंतर त्यांना पुन्हा उद्या चौकशीसाठी बोलावण्यात येणार नाही
  6. राज ठाकरे यांची चौकशी पूर्ण झाली आहे
  7. राज ठाकरेंची तब्बल साडे आठ तास ईडीकडून चौकशी
  8. सकाळी ११.३० वाजेपासून ईडीसमोर सुरुय राज ठाकरेंची चौकशी 
  9. ईडीच्या कार्यालयात सलग साडे चार तास राज ठाकरेंची चौकशी सुरु
  10. राज ठाकरे यांची मागील अनेक तासांपासून चौकशी सुरु 
  11. राज ठाकरे ईडी कार्यालयात दाखल  
  12. राज ठाकरे यांच्यासोबत आई, पत्नी शर्मिला, मुलगी उर्वशी, पुत्र अमित, सून मितालीदेखील.
  13. राज ठाकरे सहकुटुंब ईडीच्या कार्यालयाकडे रवाना 
  14. राज ठाकरे कृष्णकुंजवरुन ईडीच्या कार्यालयाकडे रवाना
  15. राज ठाकरे थोड्याच वेळात ईडीच्या कार्यालयाकडे होणार रवाना
  16. मुंबई पोलीस: मरीन ड्राईव्ह, एमआरए मार्ग, दादर आणि आझाद मैदान पोलीस स्टेशन परिसरात कलम १४४ (जमावबंदी) लागू
  17. मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
  18. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कारवाई 
  19. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात 
  20. पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरु 
  21. राज ठाकरे आज सकाळी १०:३० वाजता ईडीच्या कार्यालयात हजर होणार 

 

 

राज ठाकरेंनी सुद्धा केलंय आवाहन

दुसरीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी ठाणे बंदचं आवाहन केलं होतं. मात्र, नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये असं सांगत राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना ठाणे बंद मागे घेण्यास सांगितले होते. त्यानंतर मनसे कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयावर धडकणार असल्याचं मनसेने नियोजन केलं होतं. मात्र, राज ठाकरे यांनी कुठल्याही कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्याने ईडीच्या कार्यालयाबाहेर न येण्याची ताकीद दिली. तसेच सर्वांना २२ ऑगस्ट रोजी शांतता राखण्याचं आवाहनही यांनी केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी