मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील (Mosques) भोंग्यांच्या (loudspeaker) विरोधात भूमिका घेतली. 3 मेपर्यंत मशिदींवरील भोंगे हटवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. तर राज यांच्या निर्णयामुळे मनसेच्या काही मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी पक्षाला राम राम ठोकला आहे, परंतु राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यातच आता गुजराती समाजाने (Gujarati society) मुंबईत (Mumbai) बॅनर्ल लावत राज ठाकरेंच्या भूमिकेचं जाहीर समर्थन केलं आहे.
गुजराती समाजाकडून लावण्यात आलेल्या बॅनर्सवर हिंदुह्रदयसम्राट राजसाहेब ठाकरे असा उल्लेख सुद्धा कऱण्यात आला आहे. तसेच राज ठाकरेंनी भोंग्यांच्या बाबत घेतलेल्या मुद्द्याला आपलं समर्थन असल्याचं ही म्हटलं आहे.
राजसाहेब ठाकरेंना जाहीर समर्थन! अखंड हिंदुंचं रक्षण करणारे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरेंनतर हिंदूंचे रक्षणकर्ते आता फक्त हिंदुहृदयसम्राट मा.श्री. राजसाहेब ठाकरे हेच आहेत. हिंदुहृदयसम्राट मा. श्री.राजसाहेब ठाकरे यांनी हाती घेतलेल्या भोंग्यांच्या मुद्द्याला आम्ही जाहीर समर्थन करीत आहोत.
"3 तारखेपर्यंत जर त्यांना समजलं नाही तर..."
राज ठाकरेंनी रविवारी (17 एप्रिल) पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हटलं, हा विषय वर्षांपासून तसाच राहीलेला आहे. मला असं वाटतं की, तुम्ही जर पाच वेळा भोंगे लावणार असाल दिवसातून पाच वेळा आम्ही मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू. देशभरातील माझ्या सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की, तयारीत रहा. 3 तारखेला.. आता त्यांचा रमजान सुरू आहे. परंतु 3 तारखेपर्यंत जर त्यांना समजलं नाही, आणि या देशातील कायदा, न्यायव्यवस्थेपेक्षा स्वत:चा धर्म, लाऊडस्पीकर यांना मोठा वाटत असेल तर मला असं वाटतं जशास तसं उत्तर देणं तितकंच गरजेचं आणि आवश्यक आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आपल्याला कोणताच प्रकारच्या दंगली नको आहेत. शिवाय कोणाच्याही धार्मिक प्रार्थनेला आपला विरोध नसल्याचंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.