MNS: उद्धव ठाकरेंना मोठा शह देण्यासाठी राज ठाकरेंची प्रचंड मोठी खेळी, म्हणाले...

Raj Thackeray MNS: आधीच अडचणीत सापडलेल्या शिवसेनेला आणखी अडचणीत आणण्यासाठी आता राज ठाकरे देखील नवी राजकीय खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत. पाहा नेमकं काय करणार आहेत राज ठाकरे.

raj thackeray is ready to merge 40 rebel mla of shiv sena with mns gave a big hint
उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी राज ठाकरेंची प्रचंड मोठी खेळी.. (फाइल फोटो)  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेचे बंडखोर आमदार मनसे विलीन करुन घेण्यसाठी राज ठाकरे तयार
  • ...तर मनसेच्या आमदारांची संख्या होईल ४१
  • देवेंद्र फडणवीसांच्या साथीने राज ठाकरेंची नवी खेळी?

Raj Thackeray: मुंबई: शिवसेनेचे (Shiv Sena) ४० आमदार (MLA) फुटून हे एकनाथ शिंदेंसोबत(Eknath Shinde) गेले आहेत. यापैकी काही आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे. पण या सगळ्या आमदारांना कोर्टाने तूर्तास दिलासा आहे. पण या सगळ्या राजकीय उलथापालथीमुळे मुख्यमंत्री पद गमावलेले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पुरते बेजार झाले आहेत. अशातच मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे  शिवसेनेवर निर्णायक घाव घालण्याच्या तयारीत आहे. याबाबत त्यांनी स्पष्ट संकेत तर दिले आहेतच पण राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी एक मोठी घोषणा देखील केली आहे. (raj thackeray is ready to merge 40 rebel mla of shiv sena with mns gave a big hint)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (२३ जुलै) झी २४ तास या वृत्तवाहिनीला एक विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. मात्र, याच वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी राज ठाकरेंनी एक प्रचंड मोठ्या खेळीची तयारी केली आहे.

अधिक वाचा: उद्धव ठाकरे विश्वास ठेवण्यासारखा माणूस नाही, देश, महाराष्ट्र जेवढा ओळखत नाही, तेवढा मी ओळखतो: राज ठाकरे

ही खेळी म्हणजे शिवसेनेचे फुटलेले ४० आमदार हे मनसेत विलीन करुन घेण्याचे. जर कायदेशीर पातळीवर शिंदे गटाला काही धक्का बसला तर दुसरा पर्याय म्हणजे या सर्व आमदारांना आपला वेगळा गट स्थापन करुन एखाद्या पक्षात विलीन व्हावं लागेल. अशावेळी आता स्वत: राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे की, आपण या ४० आमदारांना मनसेमध्ये विलीन करुन घेण्यासाठी तयार आहोत. 

पाहा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले: 

शिवसेनेतून फुटलेले ४० आमदार हे मनसेत विलीन करुन घेण्याचा प्रयत्न केला जाईल. जेणेकरुन कायदेशीर पातळीवर हे आमदार गट म्हणून स्थापन होतील. त्यासाठी ते मनसेमध्ये विलीन होतील. प्रस्ताव आला तर या चाळीस आमदारांना स्वीकाराल का? असा सवाल जेव्हा राज ठाकरे यांना करण्यात आला. 

याच प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, 'हे बघा.. शेवटी हे माझ्याबरोबर जुने काम केलेले लोकं आहेत. माझे सहकारी आहेत ते पूर्वीचे. हा झाला सगळा टेक्निकल भाग. तुम्ही जसं बोलतायेत तशा बातम्या मी देखील ऐकल्या. वर्तमानपत्रात लिहून आलं वैगरे.. वैगरे.. हे टेक्निकल मला काही माहिती नाहीए.'

अधिक वाचा: मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं: चंद्रकांत पाटील

'पण उद्या समजा, त्यांच्याकडून अशा प्रकारची काही गोष्ट आली तर नक्की विचार करेन. पण माझ्या कार्यकर्त्यांना अजिबात दुजाभाव दिला जाणार नाही. माझ्यासाठी सर्वप्रथम माझा महाराष्ट्र सैनिक आहे. बाकीचे.' असं मोठं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे. 

राज ठाकरे-फडणवीसांच्या बैठकीत ठरली रणनिती?

शिवसेनेला कमकुवत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजप सध्या ऐनकेन प्रकारे प्रयत्न करत आहेत. शिवसेना दूर गेल्यानंतर राज्यात एखादा मित्र पक्ष हवा यासाठी फडणवीसांनी मनसेला जवळ केलं. गेल्या दोन वर्षात फडणवीस आणि राज ठाकरे यांची जवळीक अधिकच वाढली आहे. त्यातच सत्ता परत मिळविल्यानंतर फडणवीसांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. 

अधिक वाचा: उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला निवडणूक आयोगाची नोटीस

यावेळी या दोन नेत्यांमध्ये जवळजवळ तासभर चर्चा झाली होती. या चर्चेत आमदारांच्या विलीनकरणचा देखील तांत्रिक मुद्दा चर्चिला गेला असण्याची दाट शक्यता आता वर्तवली जात आहेत. 

यामुळे आता पुढील काही दिवसात राज्यातील राजकारणात नेमकं काय घडणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी