Raj Thackeray :  उद्धव ठाकरे तुम्ही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाहीत, राज ठाकरे यांचा राज्य सरकारला इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाहीत असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांवर दडपण आले जात आहे असा आरोप करून मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी राज्य सरकारने मोहीम राबवली का असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 

raj thackeray
राज ठाकरे 
थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाहीत
  • सर्व देशबांधवांना मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे.
  • आंदोलन सुरू करण्यापूर्वीच ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे.

Raj Thackeray : मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाहीत असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांवर दडपण आले जात आहे असा आरोप करून मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी राज्य सरकारने मोहीम राबवली का असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 


मशिदींवरील भोंगे उतरवा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. तसेच असे न केल्यास दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी ईदच्या दुसर्‍या दिवशी काही मशिदींसमोर हनुमान चालीसा लावली होती. तसेच पोलिसांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना देशपांडे यांनी पळ काढला. राज्यभरात अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांना ताब्यात घेण्यात आले होते तर काही नेत्यांना नोटीसही बजावण्यात आली होती. आता राज ठाकरे यांनी एक पत्र जाहीर करून कडक शब्दांत राज्य सरकारला सुनावले आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून म्हटले आहे की, सर्व देशबांधवांना मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यातील उच्च न्यायालयं यांनी दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दि.४ मे रोजी भोंगे उतरवा' आंदोलन सुरू करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आल्याचे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे. 

 

राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत- जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही! CMOMaharashtra

Posted by Raj Thackeray on Tuesday, May 10, 2022

तसेच राज्यात  तब्बल २८ हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं. कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी! गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडलाय की; मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी 'धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? असा सवाल राज ठाकरे यांनी पत्रातून विचारला आहे. तसेच  आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत,जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले 'रझाकार' आहेत! अर्थात, महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही! असा इशाराही राज ठाकरे यांनी या पत्राद्वारे दिला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी