Nitin Gadkari : राज ठाकरेंशी झालेली भेट संपूर्ण वैयक्तिक आणि कौटुंबिक, नितीन गडकरींकडून स्पष्टीकरण

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही भेट संपूर्ण वैयक्तिक आणि कौटुंबिक होती असे स्पष्टीकरण गडकरी यांनी दिली. शनिवारी झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपली हिंदुत्वाची भूमिका स्पष्ट केली. या भूमिकेचे भाजप नेत्यांनी स्वागत केले. अशा वेळी गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने भाजप मनसे युती होणार का अशा चर्चेला उधाण आले होते. परंतु आज कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही असे स्पष्टीकरण गडकरी यांनी दिले. 

nitin gadkari
नितीन गडकरी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
  • परंतु आज कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही असे स्पष्टीकरण गडकरी यांनी दिले. 
  • आजच्या भेटीत कुठलीच राजकीय चर्चा झाली नाही

Nitin Gadakari : मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही भेट संपूर्ण वैयक्तिक आणि कौटुंबिक होती असे स्पष्टीकरण गडकरी यांनी दिली. शनिवारी झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपली हिंदुत्वाची भूमिका स्पष्ट केली. या भूमिकेचे भाजप नेत्यांनी स्वागत केले. अशा वेळी गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने भाजप मनसे युती होणार का अशा चर्चेला उधाण आले होते. परंतु आज कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही असे स्पष्टीकरण गडकरी यांनी दिले. 


राज ठाकरे यांची भेट घेऊन गडकरी यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या मातोश्रींची तब्येत ठीक नव्हती, त्यांची विचारपूस करण्यासाठी मी इथे आलो होत. काही दिवसांपूर्वी हृदयनाथ मंगेशकर यांना पुरस्कार मिळाला त्या कार्यक्रमात राज ठाकरे यांची भेट झाली. तेव्हा राज ठाकरे यांनी घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यांनी नवीन घराला भेट देण्यासाठी आणि आईला भेटण्यासाठी आपल्याला बोलावले होते म्हणून आपण आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आल्याचे गडकरी यांनी म्हटले. गेली २५ वर्षे राज ठाकरे आणि आपली मैत्री आहे त्यामुळे आजची बैठक ही वैयक्तिक आणि कौटुंबिक आहे. तसेच आजच्या भेटीत कुठलीच राजकीय चर्चा झाली नाही असे स्पष्टीकरणही गडकरी यांनी दिले. 

२०१४ पासून भाजप मनसेची युती होणार का यावर चर्चा होत आहे. तेव्हा भाजप आणि शिवसेना यांची युती असल्याने शक्य झाले नाही. आता २०२२ ची मुंबई महानगरपालिकेत निवडणुकीत युती होणार का यावरही चर्चा सुरू होती. माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या नवीन घरी भेट घेतली होती. तेव्हा राजकीय वर्तुळात भाजप मनसेच्या युतीची चर्चा रंगली होती. परंतु उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाजप मनसे युती होणार नाही असे स्पष्ट केले आणि या चर्चेला पूर्णविराम दिला. आता उत्तर प्रदेश राज्याची निवडणूक पार पाडली असून भाजप मनसेची युती होणार का अशी चर्चा सुरू आहे. 


चर्चा होऊ शकते

कालच्या भाषणात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली, त्यामुळे आगामी चर्चा होऊ शकते अशी माहिती विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दरेकर म्हणाले की, राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतली आहे, त्याचे भाजपकडून स्वागत आहे. भाजप हिंदुत्वाची भूमिका घेऊन देशभर लढत आहे आणि काम करत आहे. राज ठाकरे सारख्या मोठ्या नेत्याने हिंदुत्वाची भूमिका घेतल्याने नितीन गडकरी यांना आनंद झाला आहे. याबद्दल भविष्यात नक्की चर्चा होऊ शकते असे दरेकर म्हणाले. तसेच गडरी आणि राज हे चांगले मित्र आहेत. यापूर्वीही त्यांची भेट झाली आहे आजही गडकरी राज यांची भेट घ्यायला गेले आहेत असेही दरेकर यांनी नमूद केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी