Raj Tthackeray: सरकारचं आमच्यावर खूप प्रेम आहे; सरकारला टोला लगावत शर्मिला ठाकरेंकडून पतीची पाठराखण 

मुंबई
Updated Aug 19, 2019 | 18:20 IST

ED sends notice to Raj Thackeray: राज ठाकरे यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. कोहिनूर मिलप्रकरणात राज ठाकरेंनना समन्स बजावण्यात आलेत. यावर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

Raj thackeray and Sharmila Thackeray
'निवडणुका आल्यानं माझ्या नवऱ्याला चौकशीत अडकवण्याचा प्रयत्न'  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटीस
  • २२ ऑगस्ट रोजी ईडीकडून होणार चौकशी
  • कोहिनूर मिलप्रकरणी राज ठाकरे यांना ईडीची नोटीस
  • विधानसभेच्या तोंडावर राज ठाकरेंना ईडीची नोटीस
  • मनसे आक्रमक, २२ तारखेला ठाणे बंदचं आवाहन
  • शर्मिला ठाकरेंनी केली पतीची पाठराखण
  • नोटिशीप्रकरणी शर्मिला ठाकरेंचा सरकारला टोला

ED Sends Notice To MNS Chief Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीनं कोहिनूर स्क्वेअर मिलप्रकरणात नोटीस बजावली आहे. येत्या २२ ऑगस्टला म्हणजेच गुरूवारी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आलेत. यावर आता राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्यानं माझ्या नवऱ्याला चौकशीच्या फेऱ्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न असल्याचं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच ईडी आणि सीबीआयची आम्हाला सवय आहे. पण राज ठाकरे यांना दबावात ठेवण्या करिता या तंत्राचा वापर करण्यात आल्याचं शर्मिला ठाकरेंनी म्हटलं आहे. 

आमच्यावर सरकारचं खूप प्रेम आहे. अशा प्रेमपत्रांची आम्हाला सवय असल्याचं म्हणत शर्मिला ठाकरेंनी सरकारला टोला लगावला आहे.  माझा नवरा घाबरणार नाही. पण चौकशीसाठी बोलवलं तर नक्की जाणार, त्यांना सगळे पेपर देखील देऊ असं म्हणत शर्मिला ठाकरेंनी आपल्या पतीची पाठराखण केली आहे. तसंच शर्मिला ठाकरे पुढे म्हणाल्या की, हे प्रकरण २००९ चं आहे आणि कोहिनूर मिल व्यवहारातन कधीच बाहेर सुद्धा पडलो आहे.  आम्हाला अशा अनेक नोटिस येत असतात. आम्ही या नोटिसांना उत्तर देण्यासाठी सक्षम असल्याचंही देखील त्यांनी म्हटलं. 

भाजप डोळे मिटून दूध पिणारं मांजर असून ज्या पद्धतीनं भाजप सरकार विरोधकांवर तुटून पडले आहेत. सरकारी संस्थांचा वापर हे नेहमीची गळ आहे. ईडीचा अर्थ आम्हाला माहित नाही, असं जर का त्यांना वाटत असेल तर आम्ही अनाडी आहोत असा त्यांचा गैरसमज असल्याचा टोला देखील शर्मिला ठाकरेंनी लगावला.

मनसे आक्रमक 

राज ठाकरेंना ईडीची नोटीस बजावल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. येत्या २२ तारखेला ठाणे बंदचं आवाहन मनसेनं दिलं आहे. तसंच रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही मनसेनं दिला.  माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशी यांनाही नोटीस पाठवण्यात आली असून ते दुपार ११ च्या दरम्यान ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. ईडीमार्फत त्यांची चौकशी सुरू आहे. 

ऐन विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना राज ठाकरेंना ईडीनं चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत. दरम्यान दुसरीकडे येत्या २१ तारखेला मुंबई ईव्हीएम मशिनविरोधात सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या मोर्चाचं नेतृत्त्व राज ठाकरे करणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागेल. 

नेमकं प्रकरण काय आहे? 

राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणि उन्मेष जोशी यांनी एकत्रित दादर इथल्या कोहिनूर स्क्वेअरसाठी मिलची जागा खरेदी केली होती. त्यासाठी आयएलएफएसकडून (ILFS) कर्ज घेण्यात आलं होतं. सरकारी क्षेत्रातली कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अॅड फायनान्शियर सर्व्हिसद्वारे कोहिनूर सीटीएनएल कंपनीला ८६० कोटी रूपयांचं कर्ज दिलं होतं. पण त्यानंतर आयएलएफएसला मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर राज ठाकरेंनी २००८ ला या प्रकरणातेल स्वतःचे सर्व शेअर्स विकले. मात्र त्यानंतरही राज ठाकरे यांनी कंपनीत सक्रिय आहेत असं सांगत या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं नोटीस पाठवली असून या प्रकरणात चौकशी करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...