मनसेचा झेंडा नव्या रंगात? राज ठाकरेंची नवी भूमिका? 

मुंबई
Updated Jan 05, 2020 | 21:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

Raj Thackeray: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या राजकीय घडामोडींदरम्यान आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे एक नवी भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. 

raj thackeray mns party flag color may change 23rd january 2020 bjp maharashtra politics news marathi google
राज ठाकरे (फोटो सौजन्य: @mnsadhikrut)  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • नव्या वर्षात राज ठाकरेंची नवी भूमिका?
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्यात बदल होण्याची शक्यता

मुंबई: राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्यात बदल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. २३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यंची जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी राज ठाकरे यांनी मनसेच्या एका महाअधिवेशनाचं आयोजन केलं आहे. यावेळी राज ठाकरे हे मनसेची भूमिका आणि नवा झेंडा सर्वांसमोर आणणार असल्याचं वृत्त आहे. मनसेचा नवा झेंडा हा पर्णपणे भगवा असल्याची चर्चा आहे. तसेच यावेळी राज ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा एकही उमेदवार रिंगणात उतरवला नाही. मात्र, राज ठाकरेंनी जाहीर सभा घेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. मनसेच्या या सभांची सर्वत्र जोरदार चर्चा होत होती. राज ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला केलेल्या या मदतीनंतरही विधानसभा निवडणुकीत मनसेला दोन्ही पक्षांनी सोबत घेतलं नाही. त्यानंतर विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा बाजुला ठेवत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली.

शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा बाजुला ठेवला तसेच भाजपसोबतची युती सुद्धा तोडली. त्यामुळे आता राज ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यावर भारतीय जनता पक्षासोबत राज ठाकरेंची मनसे युती करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

काही दिवसांपूर्वीच भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. राज ठाकरे सातत्याने भाजपवर टीका करत असताना आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्यात जवळपास एकतास चर्चा झाली. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी एकत्र येत महाराष्ट्र विकास आघाडी बनवत सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता भाजप-मनसे या नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरु झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी