[VIDEO]: राज ठाकरेंना सत्ता नाही तर हवाय विरोधी 'पत्ता'

मुंबई
सुनिल देसले
Updated Oct 10, 2019 | 15:46 IST

Raj Thackeray Rally live: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत जाहीर प्रचारसभा झाली. राज ठाकरेंचे अनकट भाषण पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.

Raj Thackeray rally live in Mumbai
राज ठाकरे   |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

 • राज ठाकरेंची मुंबईतील सांताक्रुझ परिसरात जाहीर सभा
 • विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंची प्रचारसभा
 • पुण्यातील पहिली प्रचारसभा पावसामुळे झाली होती रद्द

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत जाहीर सभा पार पडली. मुंबईतील सांताक्रुझ येथील पटेल नगर, मराठा कॉलनीत ही सभा झाली. पाहूयात राज ठाकरे कुठल्या मुद्यांवर भाष्य केलं आहे. राज ठाकरेंच्या भाषणाचा अनकट व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.

राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

 1. या सरकारकडून तुम्हाला न्याय मिळणार नाही
 2. माझ्या उमेदवारांमध्ये आग आहे ती या सरकारला जाब विचारण्याची
 3. ज्या-ज्यावेळी सणांवर बंदी आणली त्यावेळी मनसेने आवाज उठवला
 4. कुणीतरी उठतं, न्यायालयात जातं आणि आमच्या सणांवर बंदी आणतात
 5. राज्याला गरज आहे सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची
 6. राज्याला सर्वात मोठी गरज आहे प्रबळ विरोधी पक्षाची 
 7. एकच मागणी आहे - "मला विधानसभेच्या विरोधी पक्षाची धुरा हाती द्या"
 8. मी आता एक भूमिका घेतलीय ती भूमिका तुमच्यासमोर मांडायला आलोय
 9. तरुणांना नोकऱ्या देणार होते त्याचं काय झालं?
 10. तुम्ही नेत्यांना कधी प्रश्न विचारणार?
 11. पीएमसी बँकेचा घोटाळा झाला त्याच्या संचालकपदावर कोण?
 12. सरकार काय न्यायालयाकडूनही न्याय मिळत नाही
 13. काल पुण्यातील सभा पावसामुळे रद्द, एका तासाच्या पावसाने ही अवस्था झाली आता काय बोलणार?
 14. ठाण्यात लग्नाची खरेदी करायला गेलेल्या मुलीचा खड्ड्यामुळे बळी गेला
 15. रस्त्यांवर पडलेल्या खड्यांवरुन राज ठाकरेंचा संताप
 16. वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांवरुन राज ठाकरेंची टीका
 17. मला भाषणासाठी वेळ कमी मिळतो आणि प्रवासासाठी अधिक वेळ मिळतो
 18. राज ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात 
 19. राज ठाकरेंचं व्यासपीठावर आगमन 

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला नव्हता. मात्र, तरीही राज ठाकरेंनी जाहीर सभा घेत भाजप, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यावेळी राज ठाकरेंनी 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत भाजपची पोलखोल करण्यास सुरुवात केली होती. राज ठाकरेंच्या भाषणाची आणि लाव रे तो व्हिडिओची सर्वत्र जोरदार चर्चाही झाली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी