Raj Thackeray pointed error : राज ठाकरेंनी दाखवली मराठी नामफलकांच्या आदेशातील त्रुटी!

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 13, 2022 | 18:23 IST

Raj Thackeray pointed error in order of Marathi nameplates : मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुका जवळ येताच जाग आलेल्या ठाकरे सरकारने मराठी नामफलकांबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक निर्णय घेतला. या निर्णयात कळत नकळतपणे एक मोठी त्रुटी राहून गेली आहे. ही त्रुटी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्वीट करुन दाखवून दिली.

Raj Thackeray pointed error in order of Marathi nameplates
राज ठाकरेंनी दाखवली मराठी नामफलकांच्या आदेशातील त्रुटी! 
थोडं पण कामाचं
  • राज ठाकरेंनी दाखवली मराठी नामफलकांच्या आदेशातील त्रुटी!
  • महाराष्ट्राची भाषा देवनागरी लिपीत लिहिली जाणारी मराठी - राज ठाकरे
  • मराठी भाषेशिवाय इतर भाषा नामफलकांवर चालतील हा निर्णय का घेतला - राज ठाकरे

Raj Thackeray pointed error in order of Marathi nameplates : मुंबई : मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुका जवळ येताच जाग आलेल्या ठाकरे सरकारने मराठी नामफलकांबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक निर्णय घेतला. या निर्णयात कळत नकळतपणे एक मोठी त्रुटी राहून गेली आहे. ही त्रुटी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्वीट करुन दाखवून दिली. मराठी नामफलकांसाठी याआधी मनसेने मोठे आंदोलन केले होते. यामुळे नामफलकांच्या निर्णयाचे श्रेय मनसेचेच आहे; असेही राज ठाकरे म्हणाले.

मुंबई आणि ठाणे महापालिकेची याआधीची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाली होती. पुढची निवडणूक लवकरच अपेक्षित आहे. या अशा वातावरणात मराठी नामफलकांबाबतचा मंत्रिमंडळाचा निर्णय झाला आहे. विशेष म्हणजे ठाकरे सरकार नोव्हेंबर २०१९ पासून कार्यरत आहे. पण नामफलकांबाबतचा मंत्रिमंडळाच्या बैठकीतला निर्णय जानेवारी २०२२ मध्ये झाला आहे. यामुळे निर्णयामागील राजकीय संदर्भांची चर्चा जोरात आहे. ही चर्चा सुरू असतानाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निर्णयातील त्रुटी सर्वांसमोर आणली आहे.

महाराष्ट्राची भाषा देवनागरी लिपीत लिहिली जाणारी मराठी आहे. पण ठाकरे सरकारने मराठी भाषेशिवाय इतर भाषा नामफलकांवर चालतील असे निर्णय घेतानाच सांगितले आहे. ही भानगड कशासाठी; असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. 

महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार आणि याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका; असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. यामुळे नामफलकांच्या मुद्यावरुन सुरू असलेले राजकारण यापुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे. विशिष्ट लिपीत तसेच मराठी व्यतिरिक्त इतर भाषांमध्ये असणाऱ्या नामफलकांच्या विरोधात मनसे आंदोलन करण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी