Raj Thackeray press conference : मुंबई : मुंबईत १४४० मशिदी आहेत. यापैकी १३५ मशिदींवर पहाटे पाचच्या आधीच अजान झाली. या १३५ मशिदींवर पोलीस कारवाई व्हायला हवी, असे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. ते मुंबईत शिवतीर्थ येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. आधी राज ठाकरे संध्याकाळी सहा वाजता पत्रकार परिषद घेणार होते. पण काही मुद्दे तातडीने जाहीर करण्यासाठी संध्याकाळी ठरलेली पत्रकार परिषद अचानक दुपारी घेण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आणि शिवतीर्थ येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पहाटे पाचच्याआधी अजान न करणाऱ्या मशिदींच्या मौलवींचे मनसे प्रमुख राज ठाकरेंनी जाहीर आभार मानले.
मुंबईसह महाराष्ट्रातील ज्या मशिदी अनधिकृत आहेत त्यांच्यावरील भोंग्यांना पोलीस अधिकृत परवानगी कशी देऊ शकतात, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. ज्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन होणार नाही आणि ४५ ते ५० डेसिबलपेक्षा जास्त आवाजात बांग दिली जाते... अजान ऐकविली जाते त्या ठिकाणी हनुमान चालिसा लावली जाईल, असे राज ठाकरे म्हणाले. अजान ऐकविण्यासाठी माइक आणि लाउडस्पीकरची गरजच नाही. मशिदीच्या आत अजान म्हणा. आमची हरकत नाही. पण भोंगे वापरून आणि ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करून अजान ऐकविली जाणार असल्यास मनसे लगेच हनुमान चालिसा सुरू करणार असा इशारा राज ठाकरेंनी दिला. आमचे आंदोलन सर्व लाउडस्पीकर उतरविले जाईपर्यंत सुरू राहील, असेही राज ठाकरे म्हणाले.
भोग्यांचा मुद्दा हा श्रेयवादाचा मुद्दा नाही. देशात इतरांना एक दिवसाच्या लाउडस्पीकरच्या परवानगीसाठी पोलिसांकडे जावे लागते आणि मशिदींना सरसकट वर्षभराची पोलीस परवानगी कशाला... मुळात मशिदीत लाउडस्पीकरची गरज काय, असा प्रश्न करून मशिदींवरचे लाउडस्पीकर उतरविण्याच्या मागणीवर ठाम असल्याचे राज ठाकरे म्हणाले. मशिद असो वा मंदिर तिथे ध्वनी मर्यादेचे पालन व्हायला हवे. भोंगे नको; असे राज ठाकरे म्हणाले.
ध्वनी मर्यादा ४५ ते ५० डेसिबल म्हणजे घरगुती मिक्सरचा आवाज. यापेक्षा जास्त आवाजात लाउडस्पीकरवरून अजान होते. यामुळे अजानचे लाउडस्पीकर उतरवा, अशी आग्रही मागणी राज यांनी केली. जर मशिदींवरचे भोंगे उतरवले जाणार नसतील तर मनसे लगेच हनुमान चालिसा लावणार असे राज ठाकरे म्हणाले.
महत्त्वाचे मुद्दे -
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.