Raj Thackeray Speech important points, Raj Thackeray Bhashan important points : शिवाजी पार्कवरच्या सभेत राज ठाकरे जोरदार बरसले. जाणून घ्या मुंबईत झालेल्या या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे.
राज ठाकरे  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
शिवाजी पार्कवरच्या सभेत राज ठाकरे जोरदार बरसले
जाणून घ्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे
महत्त्वाचे मुद्दे
Raj Thackeray Speech important points, Raj Thackeray Bhashan important points :
CM Eknath Shinde, you must take action on loudspeakers. You must make a decision. I will meet you again on this. You must take action on this issue at the earliest: Maharashtra Navnirman Sena (MNS) chief Raj Thackeray, in Mumbai pic.twitter.com/2y7PszswoH— ANI (@ANI) March 22, 2023
संपूर्ण व्हिडीओ : सन्मा. राजसाहेबांनी आज एक अत्यंत महत्त्वाची बाब समोर आणली... सरकारचं/प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यावर काय होतं ते पहा… माहीमच्या मगदूम बाबा दर्ग्याच्या इकडे समुद्रात हे अनधिकृत बांधकाम केलं. २ वर्षांपूर्वी हे काहीच नव्हतं. इथे नवीन हाजीअली तयार करणं सुरु आहे.… pic.twitter.com/BQ2CH1NmCb — MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 22, 2023
माझी तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की येणारी रामनवमी जोरदार साजरी करा. येत्या ६ जून २०२३ ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यावेळेला मी स्वतः रायगडावर जाणार आहे. तुम्ही पण या. आणि हिंदू बांधवांना विनंती आहे की, 'दक्ष रहा.' : राज ठाकरे
देशातील राज्यघटना मानणाऱ्या मुसलमानांना मला विचारायचं आहे की, हे तुम्हाला मान्य आहे का? आम्हाला ताकद दाखवण्याची इच्छा नाही पण गरज पडली तर ताकद दाखवायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही. : राज ठाकरे
माहीमच्या मगदूम बाबा दर्ग्याच्या इकडे समुद्रात अनधिकृत बांधकाम केलंय. दोन वर्षांपूर्वी हे काहीच नव्हतं. इथे नवीन हाजीअली तयार करणं सुरु आहे. दिवसाढवळ्या हे सुरू आहे, आणि तरीही पोलीस, महापालिका यांना दिसलं नाही? : राज ठाकरे
एकनाथ शिंदेंना माझं आवाहन आहे की आता तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही आता मशिदींवरचे भोंगे उतरवा. तुम्हाला जमणार नसेल तर आमच्या कृतींकडे दुर्लक्ष करा. मशिदींवरचे भोंगे आम्ही उतरवून दाखवू. : राज ठाकरे
एकनाथ शिंदेकडे आता शिवसेना हे नाव आलं, जो विचार बाळासाहेबांचा विचार आहे. माझी एकनाथ शिंदेंना विनंती आहे की मशिदींवरच्या भोंग्यावरच्या आंदोलनाच्या वेळी मागच्या सरकारने माझ्या 17 हजार मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केलेत, ते गुन्हे मागे घ्या. : राज ठाकरे
माझी एकनाथ शिंदेंना सांगणं आहे की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही जनतेची कामं करा. महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत, त्याकडे लक्ष द्या. त्यांच्या मागे सभा घेत बसू नका. त्यांनी वरळीत सभा घेतली, की शिंदेनी वरळीत सभा घेतली. त्यांनी खेडमध्ये सभा घेतली घेतली. शिंदेनी खेडमध्ये सभा घेतली. : राज ठाकरे
मुख्यमंत्री पद मिळवायचं म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी ह्या दोन पक्षांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्याच मांडीत जाऊन बसले. अजित पवार -फडणवीस ह्यांनी शपथविधी घेतली. काय चाललंय महाराष्ट्राच्या राजकारणात? : राज ठाकरे
माननीय बाळासाहेब असते तर गेल्या अडीच वर्षांत जे घडलं ते घडलंच नसतं. 2019 च्या विधानसभेला शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली, लोकांनी या युतीला सत्तेत येण्यासाठी मतं दिली. अचानक उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मागितलं. : राज ठाकरे
बाळासाहेब असते तर शिवसेनेची अवस्था अशी झाली नसती. शिवसेना - भाजपनं एकत्र निवडणुका लढवल्या. जनतेनं विचार करायला पाहिजे. : राज ठाकरे
शिवसेना सोडताना वेदना झाल्या. मी शिवसेना सोडताना म्हणालो की, माझा वाद विठ्ठलाशी नाही तर बडव्यांशी आहे. मी शिवसेना सोडल्यानंतर बोललो होतो की हीच चार टाळकी शिवसेनेला अडचणीत आणणार. मला त्याचं वाटेकरी व्हायचं नव्हतं. : राज ठाकरे
मनसेच्या स्थापनेवेळी शिवसेना का सोडली यावर बोललो असतो पण बोललो नाही. ज्या अफवा उठवल्या की मला शिवसेनाप्रमुखपद हवं होतं. साफ झूट. शिवसेना हे शिवधनुष्य आहे ते फक्त बाळासाहेबांना पेलवलं. एकाला पेलवलं नाही, दुसऱ्याला पेलवेल की नाही ते कळेलच. : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंना समोर बसवून एकदा विचारलं, तुला काय हवं आहे? पक्षप्रमुखपद, सत्ता आली तर मुख्यमंत्रीपद हवं आहे? घे.. पण मला माझा रोल काय आहे ते सांग. : राज ठाकरे