"कोश्यारींचं वय काय, बोलतायत काय?, राज्यपालपदावर बसलाय म्हणून मान राखतोय नाहीतर..."

मुंबई
सुनिल देसले
Updated Nov 27, 2022 | 20:14 IST

Raj Thackeray Speech: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातील गटाध्यक्षांच्या मेळाव्याला संबोधित करताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

Raj thackeray takes dig on bhagat singh koshyari in mns melava watch video
"कोश्यारींचं वय काय बोलतायत काय?, राज्यपालपदावर बसलाय म्हणून मान राखतोय नाहीतर..." 
थोडं पण कामाचं
  • कोश्यारींचं वय काय बोलतायत काय? - राज ठाकरे
  • राज्यपाल पदावर बसलेयत म्हणून मान राखतो - राज ठाकरे
  • महाराष्ट्र मोठा होता आणि मोठाच आहे - राज ठाकरे

Raj Thackeray on Bhagat Singh Koshyari: मनसेच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर जात आहेत. काय चाललंय मला काही कळत नाही. 2014 रोजी सुद्धा मी हेच म्हणत होतो. मी म्हटलं होतं, उद्या या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले तर त्यांनी पहिली पाच वर्षे फक्त उत्तरप्रदेश, झारखंड आणि बिहार या तीन राज्यांवर लक्ष केंद्रीत करावे. तिथे उद्योगधंदे आणावेत. महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात येतच आहेत. पण त्या राज्यातील लोक घर-दार सोडून दुसऱ्या राज्यात जात आहेत त्यावेळी दुसऱ्या राज्यातील लोकांना त्याचा त्रास होत आहे. आजही महाराष्ट्रातील दोन प्रकल्प जात आहेत... मला गुजरातमध्ये जात आहेत त्याचं वाईट वाटत नाहीये. आसाममध्ये जावूदे, तमिळनाडूत जावूदे, ज्या-ज्या राज्यांना उद्योगधंद्यांच्याबाबत मागासलेपाणा आहे त्या-त्या राज्यात जावूदेत. तिथल्या तरुणांना-तरुणींना रोजगार मिळूदे. काही वाईट वाटण्यासारखं नाहीये. भारताततील प्रत्येक राज्य जर मोठं झालं आणि तेथील तरुण-तरुणी हे पैसे कमवायला लागले, घरात पैसे यायला लागले तर प्रत्येक राज्यासोबत देश प्रगत होईल.

हे पण वाचा : Raj Thackeray: "एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली आणि..."

राज ठाकरेंचा भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा

माझी नरेंद्र मोदी यांच्याकडून हिच अपेक्षा होती की तुम्ही गुजरात-गुजरात नका करू. या देशातील प्रत्येक राज्य तुमचं आपत्य आहे आणि त्या प्रत्येक राज्याकडे तुम्ही समानतेने पाहणं आवश्यक आहे. या उद्योगधंद्यावर त्या दिवशी आमचं धोतर बोललं नाही का.. वय काय... बोलतोय काय... काय चाललंय? राज्यपालपदावर बसलाय म्हणून मान राखतोय. नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही. काय म्हणाले होते महिन्याभरापूर्वी... म्हणे इथले गुजराती आणि मारवाडी जर परत गेले तर इथे काय होईल. कोश्यारीजी या गुजराती आणि मारवाडी समाजाला आधी विचारा तुमचं राज्य सोडून महाराष्ट्रात का आलात? तुम्ही उद्योगपती आहात ना? तुम्ही व्यापारी आहात ना? मग तुमच्या राज्यात का नाही व्यापार केला. याचं कारण, उद्योगधंदे स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रासारखी सुपीक जमीन नव्हती. तो महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा... महाराष्ट्र मोठा होता आणि मोठाच आहे.

हे पण वाचा : गुळाचा एक तुकडा बदलेल तुमचं आयुष्य, केवळ करावा लागेल हा उपाय

प्रकल्पांंचं महाराष्ट्राला प्राधान्य

महाराष्ट्र समृद्ध होताच...महाराष्ट्र काय आहे हे आम्हाला कोश्यारींकडून ऐकायचं नाहीये. आज जर आपण त्याच मारवाडी, गुजराती समाजाला सांगितलं की, जा.. आपल्या राज्यात उद्योगधंदा करा. जातील का हे... सभोवतालचं वातावरण, उद्योगधंद्याबाबतचं वातावरण आहे... आजही परदेशातील प्रकल्प जर देशात यायचा असेल तर त्यांचं पहिलं प्राधान्य महाराष्ट्राला असतं.

हे पण वाचा : अभिनेत्री उर्वशी रौतेला म्हणते, बोल्ड सीन करण्यापूर्वी....

राज ठाकरेंचा अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा

हल्ली काय झालंय... कोणीही येतंय काहीही बरळतंय... राजकारणाचा स्तर किती खाली चाललाय याला काही मर्यादा? या राजकीय पक्षाचे जे काही प्रवक्ते बोलत असतात... अरे कोणती भाषा? मी असा महाराष्ट्र आजपर्यंत कधी पाहिला नाही की, राज्यातील एक मंत्री एका महिला नेत्याला भिकारXX म्हणतो. इथपर्यंत गेलीय आपली पातळी? आणि थे सुद्धा टीव्हीवर. काय बोलत असतात ते... काय भाषा असते त्यांची. त्यांना वाटतं की विनोद करत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी