MNS Chief Raj Thackeray LIVE speech in MNS Melava: मुंबईतील गोरेगाव परिसरातील नेस्को ग्राऊंडवर मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची नक्कल करत जोरदार निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी म्हटलं, काल-परवा मुख्यमंत्री पदावर असलेले आणि आत्ता बाहेर पडलेले.... मुख्यमंत्रिपदावर असताना बघितलं.... तब्येतीचं कारण सांगून.... एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या रात्री जी काही कांडी फिरवली.... त्यानंतर आता हे फिरतायत सगळीकडे. यांच्यासारखा वागणारा मी नव्हे. स्वत:च्या स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि बागेमध्ये कोपऱ्यात जावून बसायचं... हे असले धंदे मी नाही करत. ही लोकं करणार काहीच नाही. मराठीच्या मुद्यावर असेल किंवा हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर असेल... या उद्धव ठाकरेंवर एक तरी केस (गुन्हा) आहे का? याचं कारण कधी भूमिकाच घेतलेली नाहीये. फक्त पैशासाठी कधी हा, कधी तो... फक्त मला सत्तेत बसवा इतकंच...
राज ठाकरेंनी पुढे म्हटलं, पाकिस्तानी कलावंत ज्यावेळी आपल्या इंडस्ट्रीत धुमाकूळ घालत होते त्यावेळी ढुंगणावर लात मारुन कोणी हाकलून दिली? तुम्ही.... राज ठाकरे म्हणे आता हिंदुत्त्ववादी झाले आहेत. अहो मी आधीपासूनच होतो. एका हिंदुत्त्ववादी आणि एका कट्टरतावादी मराठी घरात जन्म झालाय माझा. परत कधी पाकिस्तानी कलावंत भारतात आले नाही. हिंमत नाही त्यांची. पण या सर्व गोष्टी आहेत ना, या तुमच्या विस्मरणात टाकायच्या, विसरायला लावायच्या आणि त्यासाठी सर्व यंत्रणा चालतात.
हे पण वाचा : गुळाचा एक तुकडा बदलेल तुमचं आयुष्य, केवळ करावा लागेल हा उपाय
बाळासाहेब आधीपासून सांगत होते की, मशिदीवरील भोंगे उतरवले पाहिजेत. मनापासून त्यांची इच्छा होती आणि पूर्ण आपण केली. याचं कारण, आपण भोंगे काढा असे नाही सांगितले. नाही काढले तर हनुमान चालिसा लावू... या एका गोष्टीसाठी भोंगे निघाले. तरीही, माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांनो अजूनही काही ठिकाणी चरबी उतरलेली नाही. जिथे-जिथे असले भोंगे सुरू असतील तर पहिल्यांदा पोलिसांत तक्रार करा, त्यांनी कारवाई केली नाही तर पोलिसांवर न्यायालयाचा अपमान केल्याची केस होऊ शकते.पोलिसांकडून काही झाले नाही तर मोठ्या ट्रकवर मोठे स्पीकर लावून त्यांच्यासमोर हनुमान चालिसा लावा. त्याच्याशिवाय हे वटणीवर येणार नाही. जोपर्यंत आरेला कारे होत नाही तोपर्यंत असंच होणार नाही.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं, आपल्या सर्व गटाध्यक्षांचा मेळावा घ्यायचं असं बऱ्याच दिवसांपासून सुरू होतं. खास गटाध्यक्षांचा मेळावा घ्यायचा होता आणि तुम्हाला भेटायचं होतं म्हणून हा मेळावा घेत आहे.
हे पण वाचा : अभिनेत्री उर्वशी रौतेला म्हणते, बोल्ड सीन करण्यापूर्वी....
यावर्षी मार्च महिन्यात मनपाच्या निवडणुका होतील असं वाटत होतं पण आता डिसेंबर आला. निवडणुकांचं वातावरण दिसत नाहीये. सर्व बाजूंनी इतका खोळंबा झाला आहे त्यामुळे नक्की नेमकं काय होणार... या गटाला मिळणार की नाही मिळणार, यांना निशाणी मिळणार की नाही मिळणार? पण सर्वसाधारणपणे असं पकडू की, फेब्रुवारी-मार्च महिन्यात निवडणुका लागतील.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला स्थापन होऊन जवळपास 16-17 वर्षे झाली. या 16-17 वर्षात आपण पक्ष म्हणून ज्या-ज्या भूमिका घेतल्या, जी आंदोलने केली ती यशस्वी होण्याचा स्ट्राईक रेट पाहिला तर महाराष्ट्रात असेलल्या कोणत्याही इतर राजकीय पक्षांपेक्षा आपल्या आंदोलनाला सर्वाधिक यश आलं आहे. पण काही यंत्रणा सुरू असतात, काही यंत्रणा राबवल्या जातात... जेणेकरुन मनसेकडून जी-जी आंदोलने होतील ती लोकांच्या विस्मरणात कशी जातील यासाठीही काही यंत्रणा काम करतात.
हे पण वाचा : Vastu Tips: इतरांच्या या 6 वस्तू वापरणं टाळा अन्यथा व्हाल कंगाल
तुम्हाला आठवत असेल टोलचं आंदोलन... टोलच्या आंदोलनानंतर अनेकांना अटक झाली, अनेकांवर गुन्हे दाखल झाले. पण या आंदोलनानंतर महाराष्ट्रातील 65 ते 67 टोलनाके बंद झाले. ज्यांनी केवळ निवडणुकीच्या तोंडावर सांगितले की, आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करु त्यांना कोणीही पत्रकार विचारायला जात नाही की, टोलनाके बंद करणार होते त्याचं काय झालं? पण इतके टोलनाके बंद करुन प्रश्न आम्हाला... पण इतरांना प्रश्न अजिबात नाही. मी आता एक पुस्तिका काढणार आहे की, गेल्या 16-17 वर्षात कोणती आंदोलने केली आणि ती कशी यशस्वी झाली. ही पुस्तिका तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचणार.
आमच्या महाराष्ट्रात नोकऱ्या निर्माण होणार, माझ्या महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना इथे नोकऱ्या आहेत हे समजणार सुद्धा नाही.... इतर राज्यांतील वर्तमानपत्रात जाहिराती येणार आणि महाराष्ट्रातील वर्तमानपत्रात जाहिरात येणार नाही. कोणतं राज्य हे सहन करेल.... पण त्याला आकार काय दिला गेला. यूपी, बिहार विरोधात आंदोलन.... रेल्वेचं आंदोलन झालं तेव्हा मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकातील त्या तरुणांना विचारलं की तुम्ही कशाला आले आहात. त्यांनी सांगितलं रेल्वेची परीक्षा द्यायला आलोय. त्यावेळी एकाने आपल्या महाराष्ट्र सैनिकाला आईवरुन शिवी दिली. आईवरुन शिवी दिल्यानंतर पुढचा हंगामा झाला. मग, टीव्ही चॅनलवरील खास करुन हिंदी चॅनलने मनसेविरोधात राण उठवलं...
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.