Raj Thackreay: कल्याण डोंबिवली स्मार्ट लोकांची बकाल सिटी: राज ठाकरे

मुंबई
पूजा विचारे
Updated Oct 15, 2019 | 21:14 IST

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे जोरदार प्रचार करत आहेत. आज डोबिंवलीमध्ये सभा झाली.सेभेत त्यांनी डोंबिवलीतल्या रस्त्यांचा मुद्दा चांगलाच उचलून धरला. शहराचा बकाल सिटी म्हणून उल्लेख केला.

Raj Thackeray
Raj Thackreay LIVE: थोड्याच वेळात राज ठाकरेंच्या सभेला होणार सुरूवात  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे जोरदार प्रचार करत आहेत.
 • डोंबिवलीत आज राज ठाकरे यांची सभा पार पडली.
 • यावेळी त्यांनी डोंबिवलीतल्या रस्त्यांचा मुद्दा चांगलाच उचलला.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे जोरदार प्रचार करत आहेत. राज ठाकरेंची आज डोंबिवलीत सभा पार पडली. यावेळी त्यांनी डोंबिवलीकरांचा एकदम जवळचा मुद्दा म्हणजे खड्डे यावर भाष्य केलं. डोंबिवली शहराची बाहेर ओळख काय आहे, सुशिक्षित लोकांचे बकाल शहर असं राज ठाकरे म्हणाले. तसंच कल्याण डोंबिवलीत काय प्रगती करू शकलो असतो. नाशिकला पाच वर्षात करून दाखवलं. कल्याण डोंबिवली ही पण स्मार्ट सिटी केली आहे ना, कल्याण डोंबिवली स्मार्ट लोकांची बकाल सिटी हेच वर्णन होऊ शकते, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.  सव्वा लाख विहीरी बांधल्या. डोंबिवलीतील खड्डे पाहून त्यांनी म्हटले असते तर मी म्हणून समजू शकतो असं सांगत राज ठाकरे यांनी खड्ड्यातील मृत्यूमुखी व्यक्तींची यादीच वाचून दाखवली.

 

 

राज ठाकरे यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे:

 1. भाकरी का करपली, कारण उलटली नाही. कोणी का असो, तो ते माझ्या पक्षाचे असतील त्यांना बदलल्याशिवाय बदल घडणार नाही- राज ठाकरे
 2. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम कुठे आणि त्यांच्या पक्षाच्या आमदारांचे काम कुठे
 3. अशी शहरं नसतात, परदेशात एकदा जाऊन पाहा- राज ठाकरे
 4. शीळ फाट्याजवळ माझ्या गाडीसमोर एक गाय आली. ती पण व्यवस्थेला कंटाळली असेल... याला शहरं म्हणत नाही. 
 5. तुम्हांला ही परिस्थिती आवडत असेल तर कशाला हवा निवडणुकीचे खेळ. कशाला आम्ही उमेदवार उभे करायचे, घसे कोरडे करायचे
 6. आम्हांला आमच्या भाषेची अस्मिता नाही, आम्ही मनं मेली नाही. आमची पोरं बेकार राहताहेत, उद्योग बंद पडताहेत, आम्हांला काही फरकच पडत नाही.
 7. बाहेरून लोंढे येत आहेत, त्यावेळी आपल्या राज्यकर्त्यांनी आपल्या शहरांना सांभाळला पाहिजे. 
 8. इथल्या आमदारांना नगरसेवकांना तुम्हांला प्रश्नही विचारता येत नाही. दुसऱ्याच्या घरी दुःख म्हणून आम्हांला काय. एवढी लोकसंख्या आहे, एखाद दोन गेले तर आम्हांला काही फरक पडत नाही. मनं मरून गेली आहेत- राज ठाकरे
 9. महाराष्ट्रात १४ हजार शेतकरी आत्महत्या करतात आम्हांला काही फरकच पडत नाही.
 10. म्हणे सव्वा लाख विहीरी बांधल्या. डोंबिवलीतील खड्डे पाहून त्यांनी म्हटले असे तर मी म्हणून समजू शकतो. राज ठाकरे यांनी खड्ड्यातील मृत्यूमुखी व्यक्तींची यादीच वाचून दाखवली.
 11. त्यानंतर भाजप-सेनेचे सरकार आले. त्यानंतर तरूण तडफदार देवेंद्र फडणवीस आले. मी कौतुक केले. पण हे खोटं कशाला बोलायचे.
 12. पृथ्वीराज चव्हाण हे जुन्या जमान्यातील राज शेखर सारखे दिसायचे हे मी औरंगाबाद मधील सभेत सांगितले होते.
 13. काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार होते. त्यातील पृथ्वीराज चव्हाण यांनी जेवढ्या दिवस कारभार केला, तो वांछोटा कारभार केला. त्याचा महाराष्ट्राला फायदा झाला नाही की त्यांच्या पक्षाला- राज ठाकरे
 14. ज्या पद्धतीने या शहरावर लक्ष दिले जायला पाहिजे ते दिले जात नाही. बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या लोंढ्यांचे सर्वाधिक प्रमाण हे ठाणे जिल्हा आहे.
 15. नाशिकला पाच वर्षात करून दाखवलं. कल्याण डोंबिवली ही पण स्मार्ट सिटी केली आहे ना, कल्याण डोंबिवली स्मार्ट लोकांची बकाल सिटी हेच वर्णन होऊ शकते.- राज ठाकरे
 16. कल्याण डोंबिवलीत काय प्रगती करू शकलो असतो. बाहेरच्या राज्यातून येणाऱ्यांनाही वाटते, आमच्या राज्यासारखे वाटते, काय ती ओळख करून ठेवली आहे कल्याण डोंबिवलीची.
 17. देवेंद्र फडणवीस यांनी ६ हजार कोटींचे आश्वासन दिले होते. दिले नाही ती वेगळी गोष्ट आहे.
 18. राज ठाकरेंनी सांगितली रामायणाची गोष्ट, राम १४ वर्ष वनवासात होते, तेवढे वर्ष वांद्रे वरळी सी लिंकला लागले. वांद्रे वरळीच्या दिरंगाईवरून राज ठाकरे यांची टीका
 19. अमेरिकेतील एम्पायर स्टेट बिल्डिंग १६ महिन्यात बांधली आहे. ती १९३२ मध्ये
 20. भारतातून सर्वात जास्त सीए हे डोंबिवलीतून येतात. पण शहराचे अकाउंट कधी चेक केले नाही. त्यामुळे हे शहर बकाल झाले आहेत. अनेक जण परदेशात गेले आहेत. 
 21. डोंबिवली शहराची बाहेर ओळख काय आहे, सुशिक्षित लोकांचे बकाल शहर... काय ओळख आहे- राज ठाकरे
 22. निवडणुका संपायला २-४ दिवस बाकी आहेत. आज मी भाषण करायला आलो नाही, गेली अनेक वर्ष मी येतो, मी भाषण नाही तुमच्याशी गप्पा मारायला आलो आहे. या गप्पांमध्ये माझे काही प्रश्न आहोत. त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तुमची ठरवा, त्यावर विचार करा.
 23. डोंबिवलीत राज ठाकरे यांची प्रचारसभा
 24. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाला सुरूवात
 25. थोड्याच वेळात राज ठाकरे यांच्या सभेला होणार सुरूवात

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी