मुंबई : शिवसेना हे नाव आणि धनुष्य बाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. त्यात उद्धव ठाकरे यांच्या चुलत भाऊ आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक डिवचणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी बाळासाहेबांचा आवाज वापरला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात काढलेले उद्गार यावेळी राज ठाकरे यांनी व्हिडिओच्या माध्यामातून ट्विट केले आहे.
टाइम्स नाऊ मराठीने बाळासाहेबांच्या जयंती निमित्त पुण्यातील एक भाषण पुन्हा प्रसिद्ध केले होते. त्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांनी हे उद्गार काढले होते. त्याचा वापर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचण्यासाठी केला आहे.
बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं
#शिवसेना #बाळासाहेब_ठाकरे #Legacy
असे म्हणत राज ठाकरे यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.