राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशवासियांसह संपूर्ण देशाची माफी मागावी!

देशभरात भोंग्याच्या मुद्दयावरून धार्मिक तणाव निर्माण करणारे राज ठाकरे यांनी उत्तप्रदेशसह संपूर्ण देशाची माफी मागावी, अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी बुधवारी  केली.

Raj Thackerayni Uttar Pradesh people cum full countrymen apologize
राज यांनी उत्तर प्रदेशवासियांसह संपूर्ण देशाची माफी मागावी 
थोडं पण कामाचं
  • देशभरात भोंग्याच्या मुद्दयावरून धार्मिक तणाव निर्माण करणारे राज ठाकरे यांनी उत्तरदेशसह संपूर्ण देशाची माफी मागावी
  • अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी बुधवारी  केली.
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रोजगारासाठी स्थलांतरण करणाऱ्या या गोरगरीब बांधवांची छळवणूक करण्यात आली होती

मुंबई : देशभरात भोंग्याच्या मुद्दयावरून धार्मिक तणाव निर्माण करणारे राज ठाकरे यांनी उत्तप्रदेशसह संपूर्ण देशाची माफी मागावी, अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी बुधवारी  केली. (Raj Thackerayni Uttar Pradesh people cum full countrymen apologize!)

पक्ष स्थापनेच्या वेळी ठाकरे यांनी उत्तर प्रदेश, बिहार वासियांविरोधात भूमिका घेतल्याने मुंबईसह राज्यातील इतर ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रोजगारासाठी स्थलांतरण करणाऱ्या या गोरगरीब बांधवांची छळवणूक करण्यात आली होती. ठाकरे यांनी गलीच्छ राजकारण करण्यासाठी भारतीय धर्म पाळला नाही. अशात उत्तर प्रदेशातील भाजप खासदाराने ठाकरे यांच्या अयोध्या दौर्यापूर्वी घेतलेली भूमिका चुकीची नाही. परंतु, गेल्या काळात मुंबई, ठाणे औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेतून विशिष्ट समुदायाबद्दल गरळ ओकत राज ठाकरे यांनी देशातील वातावरण कलुषीत केले.

काही राज्यांमध्ये त्यामुळे धार्मिक दंगली देखील उफाळून आल्या. त्यामुळे अयोध्या दौऱ्यापूर्वी ठाकरे यांनी देशाची माफी मागावी. मर्यादापुरुषोत्तम रामजन्मभूमीचे दर्शन घेवून ठाकरे यांनी किमान त्यांचा आदर्श घेत आपल्या मर्यादा ओळखाव्यात, असे आवाहन देखील पाटील यांच्यावतीने करण्यात आले आहे. 

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा ही केवळ राजकीय स्टंटबाजी असून भाजप पुरस्कृत या कार्यक्रमात भाजपच्याच खासदारांनी विरोध केल्यामुळे भाजपची दुटप्पी भूमिका उघड होत आहे.केवळ राजकीय फायद्यासाठी राज ठाकरे यांना हाताशी घेत, त्यांना पाठबळ पुरवून त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून भाजप महाविकास आघाडी वर निशाणा साधू बघत आहे. परंतु राज ठाकरे यांच्या सोयीची भूमिका कशापद्धतीने बदलते हे महाराष्ट्रातील जनतेला चांगल्या पद्धतीने ठाऊक झाले आहे.

ठाकरे यांचा उत्तर प्रदेशचा दौरा असो की उत्तर भारतीयांविरोधात घेतलेली त्यांची भूमिका, गेल्या काळात त्यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे राज ठाकरे यांचे राजकीय भवितव्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. परंतु राज ठाकरे यांना राजकीय पाठबळ पुरवून भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडीच्या विरोधात षडयंत्र रचत असल्याचा आरोप हेमंत पाटील यांनी या निमित्ताने केला. देशाचे वातावरण राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे संवेदनशील झाले आहे.अशात एका विशिष्ट समुदायामध्ये ठाकरे यांच्या भूमिकेमुळे असुरक्षितता निर्माण झाले आहे. 

उत्तर भारतीयांविरोधात राज ठाकरे यांनी घेतलेली राजकीय भूमिका, त्यातून महाराष्ट्रात निर्माण झालेले तणावाचे वातावरण आणि परप्रांतात मराठी जनतेला भोगावे लागलेल्या यातना यामुळे राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेश सह बिहार, झारखंडच्या नागरिकांची माफी मागावी शिवाय गेल्या काळात ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे देशभरात निर्माण झालेल्या अविश्वासाच्या वातावरणात सर्वसामान्य दहशतीखाली जगत आहे त्यामुळे ठाकरे यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी, असे मागणीचा पुनरोच्चार करतांना पाटील म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी