Raj Thackeray: राज ठाकरेंच्या आंदोलनाचे उत्तरप्रदेशात उमटले पडसाद? मशिदींसमोर वाजू लागली हनुमान चालीसा 

मुंबई
Updated Apr 15, 2022 | 11:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

Raj Thackeray News | राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या शिवतीर्थावरील सभेनंतर राज्याच्या राजकारणात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. मात्र आता महाराष्ट्रातील मशिदींवरील भोग्यांचा वाद आता देशभरातील विविध राज्यांमध्ये वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Raj Thackeray's agitation has repercussions in Uttar Pradesh
राज ठाकरेंच्या आंदोलनाचे उत्तरप्रदेशात उमटले पडसाद?   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज ठाकरेंचा सरकारला ३ मे पर्यंतचा अल्टीमेटम.
  • मशिदींवरील लाऊडस्पीकरचा वाद देशभरातील विविध राज्यांमध्ये दिसून येत आहे.
  • अलीगढमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने चौकात लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा पठण करण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे.

Raj Thackeray News | मुंबई : राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या शिवतीर्थावरील सभेनंतर राज्याच्या राजकारणात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. मात्र आता महाराष्ट्रातील मशिदींवरील भोग्यांचाा वाद आता देशभरातील विविध राज्यांमध्ये वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेतून मशिदींवरील भोग्यांबाबत सरकारला ३ मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तसेच ३ मे पर्यंत यावर तोडगा काढला नाही तर त्यानंतर मनसैनिकांना मशिदींसमोर भोंग्यावर हनुमान चालिसा लावण्याचा आदेश दिला आहे. (Raj Thackeray's agitation has repercussions in Uttar Pradesh). 

अधिक वाचा : रॉकेटच्या वेगाने थ्रो फेकल्याने थांबवावा लागला सामना

दरम्यान आता मशिदींवरील भोंग्याचा वाद केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून याचे पडसाद देशभरामध्ये उमटत आहेत. उत्तर प्रदेशातही हा वाद पेटताना दिसत आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी दिलेल्या आदोंलनाची हाक आता उत्तर प्रदेशपर्यंत पोहचल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये युवा क्रांती मंचच्या कार्यकर्त्यांनी गांधी पार्कमध्ये लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसाचे पठण केले आहे. आम्ही यापूर्वी देखील प्रशासनाला मशिदींवरील लाऊडस्पीकर बंद करण्यासाठी पत्र दिले होते असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र त्यावर अद्याप कोणताच ठोस निर्णय घेतला नसल्यानेच आम्ही हनुमान चालिसेचे पठन केले आहे. असे त्यांनी म्हटले. 

अधिक वाचा : IPL 2022: विजयानंतर सचिन तेंडुलकरच्या पाया पडला जाँटी ऱ्होडस

युवा क्रांती मंचने लावली हनुमान चालिसा 

युवा क्रांती मंचच्या शिवांग तिवारी यांनी भर चौकात लाऊडस्पीकर लावण्यात येतील असे सांगितले असून यासाठी सकाळी ५ आणि संध्याकाळी ५ ची वेळ ठरवण्यात आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे याच वेळेत अजान होते. त्याचवेळी आमचा हनुमान चालिसा होईल असे त्यांचे म्हणणे आहे. आम्ही हनुमान चालिसा पठण आणि आरती करणार असल्याचे त्यांनी आणखी म्हटले. 

अलीगढमध्ये वाढतोय लाऊडस्पीकरचा वाद 

अलीगढमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) वतीने चौकात लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा पठण करण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. दरम्यान त्यांनी देखील राज ठाकरेंप्रमाणे प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे. ABVP चे बलदेव चौधरी यांनी म्हटले की, जर प्रशासनाने परवानगी दिली नाही आणि काही योग्य कारण दिले नाही तर आम्ही १९ एप्रिल रोजी परवानगीशिवाय लाऊडस्पीकर लावणार असल्याचा इशारा दिला आहे. 

लक्षणीय बाब म्हणजे अलीगढमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा पठण करण्याबाबत मंत्री धर्मपाल सिंग यांना विचारणा केली असता त्यांनी माध्यमांवर संताप व्यक्त केला. अनावश्यक वाद निर्माण केला जात असून आम्हाला कोणत्याही प्रकारचा असा प्रकार दिसला नसल्याचे त्यांनी म्हटले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी