हिंदू राष्ट्राच्या मजबुतीसाठी राज ठाकरेंचा अयोध्या दौरा; कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्यांच्या भेटीनंतर निर्णय

मुंबई
भरत जाधव
Updated Oct 18, 2021 | 13:01 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर जाणार आहेत. कांचन गिरीजी (Kanchan Giriji) आणि जगतगुरू सूर्याचार्य (Jagatguru Suryacharya) यांनी राज यांना अयोध्याला येण्याचे निमंत्रण दिले आहे.

Raj Thackeray's visit to Ayodhya
हिंदू राष्ट्राच्या मजबुतीसाठी राज ठाकरेंचा अयोध्या दौरा  |  फोटो सौजन्य: फेसबुक
थोडं पण कामाचं
  • उत्तर भारतीयांच्या मुद्द्यांवरून राज यांच्यावर टीका
  • कांचनगिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्यजी यांनी शिवतिर्थावरील शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं.
  • हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठी राज अयोध्येला जाणार आहेत.

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर जाणार आहेत. कांचन गिरीजी (Kanchan Giriji) आणि जगतगुरू सूर्याचार्य (Jagatguru Suryacharya) यांनी राज यांना अयोध्याला येण्याचे निमंत्रण दिले आहे. राज यांनी हे निमंत्रण स्वीकारले असून दिवाळीत अयोध्येत जाण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदू राष्ट्र (Hindu Rashtra)मजबूत करण्यासाठी राज हे अयोध्येला जाणार आहेत.

कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी आज राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. यावेळी राज यांनी त्यांचे सपत्नीक स्वागत केले. त्यानंतर राज आणि महंतांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. यावेळी जगतगुरू सूर्याचार्याजी यांनी राज यांना अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले. तसेच अयोध्येत येऊन हिंदूराष्ट्राच्या कार्यासाठी हातभार लावण्याची विनंतीही राज यांना करण्यात आली. राज यांनीही हे निमंत्रण स्वीकारले आहे. राज यांनी दिवाळीत अयोध्येला जाण्याचा निर्णयही घेतला आहे.

उत्तर भारतीयांविषयीची भूमिका अज्ञानातून 

परप्रांतियांचा मुद्दा अज्ञानातून कांचनगिरी मां यांनी काल उत्तर भारतीयांच्या मुद्द्यांवरून राज यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरे यांनी ती भूमिका अज्ञानातून घेतल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आजच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागले होते. दरम्यान, कांचनगिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्यजी यांनी शिवतिर्थावरील शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी राज यांची भेट घेतली.

दरम्यान, राज ठाकरे यांनी गेल्या दोन वर्षांपासून हिंदुत्वाचा पुरस्कार केला होता. त्यानंतर आता हिंदुराष्ट्राच्या उभारणीसाठी राज यांनी अयोध्येला जाण्याचे महंतांना आश्वासन दिले आहे. त्यामुळे राज ठाकरे परप्रांतियांचा मुद्दा सोडून हिंदुत्वाकडे जाणार असल्याचे सांगितले जात आहे. राज यांच्या या नव्या भूमिकेमुळे मनसे आणि भाजपमध्ये युती होण्याचे संकेतही मिळत आहेत.

दरम्यान, गेल्यावर्षी मनसेच्या पहिल्या अधिवेशनानिमित्त मुंबईत दादरमधील शिवसेना भवनासमोर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो असलेलं भगवं पोस्टर लावण्यात आले होते. ‘सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट’ असं या पोस्टरवर लिहिले होते. सेनाभवनासमोर गुहे भव्य पोस्टर लावण्यात आले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी