Rajyasabha Election : 'अशी' जुळणार राज्यसभेच्या मतांची गणिते, 'या' दोन उमेदवारांमध्ये होणार चुरस

Victory will be based on the second preference vote : शिवसेनेकडून संजय राऊत , भाजपकडून पीयुष गोयल, डॉ. अनिल बोंडे,  राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, काँग्रेसकडून इमरान प्रतापगढी यांना पहिल्या पसंतीच्या मतांची कमतरता भासणार नाही असं दिसतंय. मात्र, सहाव्या जागेसाठी सेनेचे संजय पवार, भाजपचे धनंजय महाडिक या दोन कोल्हापूरकरांमध्येच लढत होणार असं दिसतं आहे.

Victory will be based on the second preference vote
'अशी' जुळणार राज्यसभेच्या मतांची गणिते 
थोडं पण कामाचं
  • राज्यसभेच्या ६ जागांसाठी एकूण ७ उमेदवार रिंगणात आहेत
  •  शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात रस्सीखेच होणार
  • अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे ३ जून आहे

मुंबई : राज्यसभेच्या ६ जागांसाठी एकूण ७ उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे ३ जून असून, तोपर्यंत कुणी माघार घेतली नाही तर निवडणूक होणार हे आता अटळ आहे. जर येत्या ३ जून पर्यंत एका उमेदवाराचा अर्ज काढून घेण्यात नाही आला तर ही निवडणूक अटीतटीची होणार हे मात्र नक्की. दरम्यान, त्यामुळे सहाव्या जागेवर नेमकं कोण बाजी मारणार याची उत्सुकता देखील सर्वाना लागली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीची पद्धत ही एखाद्या बुद्धिबळाच्या पटासारखी असते. ज्यात पहिल्या पसंतीच्या मतांसोबतच दुसऱ्या पसंतीचीही मतं निर्णायक ठरतात. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल ही मतांची आखणी कोण व्यवस्थित करतं यावरच सर्व गणिते अवलंबून असतात.

अधिक वाचा  ; ज्या मुलींचे नाव ३ अक्षरांनी सुरू होते, पतीला बनवतात करोडपती

 शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात रस्सीखेच होणार

विधानसभेतील आमदारांचे एकूण संख्याबळ पाहिलं तर भाजपचे २, शिवसेनेचा १, राष्ट्रवादीचा १, काँग्रेसचा १ खासदार निवडून येऊ शकतात. तर, भाजपला आपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी तर महाविकास आघाडीला आपला चौथा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे, हे मात्र नक्की. त्याचबरोबर, राज्यसभेची निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीची किमान ४२ मतं आवश्यक आहेत. सदर राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे ४ तर भाजपकडून ३ असे एकूण सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे साहजिकच राज्यसभेसाठी मतांची आकडेमोडही सुरु झाली आहे. त्यामुळे सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात रस्सीखेच होणार हे उघड आहे. 

अधिक वाचा ; उमरान मलिक नाही तर हा खेळाडू ठरला सर्वात वेगवान गोलंदाज

हे आहेत उमेदवार आणि पक्ष?

शिवसेनेकडून संजय राऊत , भाजपकडून पीयुष गोयल, डॉ. अनिल बोंडे,  राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, काँग्रेसकडून इमरान प्रतापगढी यांना पहिल्या पसंतीच्या मतांची कमतरता भासणार नाही असं दिसतंय. मात्र, सहाव्या जागेसाठी सेनेचे संजय पवार, भाजपचे धनंजय महाडिक या दोन कोल्हापूरकरांमध्येच लढत होणार असं दिसतं आहे.  

अधिक वाचा ;  दिव्यांग वडीलांचा मुलीच्या शिक्षणासाठी संघर्ष, पहा व्हिडीओ 

४२ पेक्षा कमी मतं मिळाली तर मग दुसऱ्या पसंतीची मतं मोजली जातात

सध्याच्या स्थितीत धनंजय महाडिक, संजय पवार यांना पहिल्या पसंतीची साधारण २५  ते ३० च्या आसपास मतं मिळतील असं दिसतं आहे. पण ती विजयासाठी पुरेशी नाहीत. त्यामुळे कोण विजयी होणार याचा फैसला दुसऱ्या पसंतीच्या मतांवर होऊ शकतो. राज्यसभेसाठी मतदान करताना आमदारांना उमेदवारांना १,२,३,४ असे पसंतीक्रम द्यावे लागतात. त्यामुळे पहिल्या पसंतीची मतं ठरवतानाच दुसऱ्या पसंतीच्या मतांचीही रणनीती देखील विजयात महत्वाची ठरणार आहे. ४२ पेक्षा कमी मतं मिळाली तर मग दुसऱ्या पसंतीची मतं मोजली जातात. महाराष्ट्रापुरते बोलायचं तर पहिल्या पसंतीची किमान ४२ मतं ज्या उमेदवाराला मिळतील तो पहिल्याच राऊंडमध्ये विजयी ठरतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी