'पवारांच्या मांडीवर बसून उद्धव ठाकरे काम करतात', रामदास कदमांची जहरी टीका

मुंबई
रोहित गोळे
Updated Jul 27, 2022 | 21:16 IST

Ramdas Kadam venomous criticism : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मांडीवर बसून काम करत आहेत. अशी अत्यंत जहरी टीका रामदास कदम यांनी केली आहे.

ramdas kadam venomous criticism on uddhav thackeray sharad pawar shiv sena
पवारांच्या मांडीवर बसून उद्धव ठाकरे काम करतात: रामदास कदम  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
  • उद्धव ठाकरे शरद पवारांच्या मांडीवर बसून करतायेत काम
  • मला आणि मुलाला संपवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला, रामदास कदमांचा आरोप

Ramdas Kadam: मुंबई: 'उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मांडीवर बसून काम करत आहेत. त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी बेईमानी, बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आहे. त्यामुळे मी त्यांना माजी मुख्यमंत्री म्हणूनच शुभेच्छा देईल.' अशी जहरी टीका शिवसेनेतून (Shiv Sena) बाहेर पडलेले नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केली आहे. (ramdas kadam venomous criticism on uddhav thackeray sharad pawar shiv sena )

रामदास कदमांची अत्यंत घणाघाती टीका

'मी त्यांना माजी मुख्यमंत्री म्हणूनच शुभेच्छा देईल. त्याचं कारण असं आहे की, त्यांनी शरद पवारांचं नेतृत्व सोडून, बाळासाहेबांच्या विचाराचं नेतृत्व ठेवलं असतं तर आम्ही निश्चितपणे त्यांना शिवसेनेचं प्रमुख म्हटलं असतं. पण आज ते बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून काम करत नाहीत ते शरद पवारांच्या मांडीवर बसून शरद पवारांच्या विचारांशी सहमत होऊन सगळं काम करत आहे.' 

अधिक वाचा: बाळासाहेब ठाकरेंचा शेवटचा आदेश का नाही पळाला?

'बाळासाहेबांच्या विचाराशी बेईमानी, बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम, त्यांच्या विचाराशी गद्दारी ही दुर्दैवाने उद्धव ठाकरेंकडून झाली आहे.' अशी अत्यंत जहरी टीका रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

'मला आणि माझ्या मुलाला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला'

दरम्यान, याचवेळी रामदास कदम यांनी असाही आरोप केला की, त्यांना त्यांच्या मुलाला राजकीयदृष्ट्या संपविण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला.

'उद्धवजी हॉस्पिटलला असताना सहा मिटिंग झाल्या तिथे. रामदास कदम आणि योगेश कदम यांना आयुष्यातून उठवून टाका, संपवून टाका. तुम्ही हॉस्पिटलला आणि मिटिंगला कोण तर सुभाष देसाई, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत, आदित्य ठाकरे हे सगळे त्या मीटिंगला. अशा पद्धतीने हॉस्पिटलला असताना देखील आमच्याविरुद्ध कट-कारस्थान करुन आम्हाला संपवायला निघाले असाल तर तुम्ही आम्हाला संपवत नाही तर तुम्ही शिवसेनेला संपवत आहात.' असं म्हणत रामदास कदम यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्ला चढवला.

अधिक वाचा: उद्धव ठाकरे यांनी घेतली शरद पवार यांची बाजू

उद्धव ठाकरे काय उत्तर देणार?

उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद गेल्यानंतर रामदास कदम हे अचानक खूपच अॅक्टिव्हेट झाले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच रामदास कदम यांनी शिवसेनेच्या नेते पदाचा राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश केला. अशावेळी आता उद्धव ठाकरे हे रामदास कदम यांना नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी