मुंबई : अमरावतीच्या (Amravati) खासदार (MP) नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्या अटकेनंतर राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्षनेते (Opposition Leader) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारच्या या कारवाईवर टीका करताना ठाकरे सरकार जोरदार हल्लाबोल केला. महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा केली जातेय, त्याची साधी दखल सुद्धा नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी या संबंधी एक ट्वीट केलं आहे. ते म्हणाले की, इतकी दंडुकेशाही? इतका अहंकार? इतका द्वेष? सत्तेचा इतका माज? सरकारच करणार हिंसाचार एवढीच तुमची मदुर्मकी? सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या, पण, जनता सारे काही पाहते आहे. निव्वळ लज्जास्पद. लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला? लोकशाहीचे गार्हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का? देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "भाजपाच्या पोलखोल रथावर हल्ले झाले, त्यातील आरोपी अटकेत नाही. मोहित भारतीय यांच्यावर हल्ला झाला, त्यावर साधा गुन्हा दाखल नाही. हनुमान चालिसा पठणाला राणा दाम्पत्य येतात तर थेट त्यांना अटक केली जातेय.", असा बोलत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
दरम्यान, राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर 153 अ हे कलम लावण्यात आलं आहे. उद्या राणा दाम्पत्याला न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. काही वेळापूर्वीच राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.