राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा आंदोलन मागे घेतले

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 23, 2022 | 16:17 IST

Rana couple withdrew Hanuman Chalisa recitation : महाराष्ट्रात सध्या भोंगे आणि हनुमान चालिसा हे दोन मुद्दे गाजत असल्याचे चित्र आहे. या अशा वातावरणात खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी त्यांचे 'हनुमान चालिसा' पठणाचे आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले.

Rana couple withdrew Hanuman Chalisa recitation
राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा आंदोलन मागे घेतले  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा आंदोलन मागे घेतले
  • फेसबुक लाइव्ह करून 'हनुमान चालिसा' पठणाचे आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले
  • पीएम मोदींच्या रविवारच्या मुंबईतील कार्यक्रमाला गालबोट लागू नये म्हणून आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले

Rana couple withdrew Hanuman Chalisa recitation : मुंबई : महाराष्ट्रात सध्या भोंगे आणि हनुमान चालिसा हे दोन मुद्दे गाजत असल्याचे चित्र आहे. या अशा वातावरणात खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी त्यांचे 'हनुमान चालिसा' पठणाचे आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले.

शिवसेना अन् मुख्यमंत्र्यांकडून मला ठार मारण्याचा प्रयत्न - मोहित कंबोज यांचा आरोप

मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर 'हनुमान चालिसा' पठण करणार असे राणा दाम्पत्याने जाहीर केले होते. राणा दाम्पत्याला विरोध करण्यासाठी शिवसैनिकांनी मुंबईतील राणा दाम्पत्याच्या घराला घेराव घातला होता. ही परिस्थिती दुपारपर्यंत कायम होती. शिवसैनिक आणि राणा दाम्पत्य यांच्यातील तणाव वाढला होता. या वातावरणात राणा दाम्पत्याने दुपारी तीनच्या सुमारास फेसबुक लाइव्ह करून 'हनुमान चालिसा' पठणाचे आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले.

उद्या म्हणजेच रविवार २४ एप्रिल २०२२ रोजी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत असतील. पंतप्रधान मोदी यांना पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा मुंबईत आहे. या सोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून राणा दाम्पत्याने 'हनुमान चालिसा' पठणाचे आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले.

बाळासाहेब ठाकरे आमच्या मनात आहेत आणि त्यांचे निवासस्थान असलेला मातोश्री बंगला आमच्या हृदयात आहे. या ठिकाणी 'हनुमान चालिसा' पठणाचे आंदोलन करण्याची घोषणा राणा दाम्पत्याने केली होती. पण शिवसैनिकांनी या आंदोलनाला विरोध केला. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून पोलिसांनी दबाव टाकायला सुरुवात केली. जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली तरी राणा दाम्पत्याच्या त्यांच्या आंदोलनावर ठाम होते. पण पंतप्रधान मोदी यांचा दौरा ठरल्याप्रमाणे होणार आहे हे निश्चित होताच राणा दाम्पत्याने दौरा टळू नये म्हणून जाहीर केलेले आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.

लोकप्रतिनिधी असलेल्या व्यक्तींना विरोध केला जात आहे. पोलिसांकरवी त्यांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात पश्चिम बंगाल सारखी परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे हे सर्व होत आहे. शिवसेना हिंदुत्व विसरली आहे आणि सत्तेचा विचार करत आहे, अशा स्वरुपाचा आरोप राणा दाम्पत्याने यांनी केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी