Rana vs. Shiv Sena: सुटकेनंतर राणा दाम्पत्याला करावं लागणार 'या' पाच अटींचं पालन; मीडियाच्या बूम अन् कॅमेऱ्यांपासून राहावे लागेल दूर

मुंबई
भरत जाधव
Updated May 05, 2022 | 12:29 IST

तब्बल 12 दिवसांचा तुरुंगवास (Imprisonment) भोगल्यानंतर राणा दाम्पत्याची (Rana couple) आज सुटका होणार आहे. राणा दाम्पत्य 23 एप्रिलपासून राजद्रोहाच्या (Sedition) आरोपाखाली भायखळा तुरुंगाच्या कैदेत आहेत.

Rana couple will have to abide by these five conditions
राणा दाम्पत्याला करावं लागणार 'या' पाच अटींचं पालन  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • न्यायालयाकडून निकालाची पूर्ण तपशीलवार प्रत तुरुंग प्रशासनाला न मिळाल्याने दोघांची बुधवारी सुटका झाली नाही.
  • नवनीत राणा अनेक दिवसांपासून पाठदुखीमुळे त्रस्त आहेत.
  • दोघांची सुटका झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या त्यांच्या खार येथील निवासस्थानी त्यांची भेट घेणार

Rana vs. Shiv Sena:   मुंबई : तब्बल 12 दिवसांचा तुरुंगवास (Imprisonment) भोगल्यानंतर राणा दाम्पत्याची (Rana couple) आज सुटका होणार आहे. राणा दाम्पत्य 23 एप्रिलपासून राजद्रोहाच्या (Sedition) आरोपाखाली भायखळा तुरुंगाच्या कैदेत आहेत. दरम्यान मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) अमरावतीच्या (Amravati) अपक्ष खासदार (Independent MP) नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे आमदार पती रवी राणा (MLA husband Ravi Rana) यांना दिलासा देत काल जामीन (Bail) मंजूर केला. तरीदेखील राणा दाम्पत्याला बुधवारची रात्र तुरुंगात काढावी लागली.

न्यायालयाकडून निकालाची पूर्ण तपशीलवार प्रत तुरुंग प्रशासनाला न मिळाल्याने दोघांची सुटका होऊ शकली नाही. आज याबाबत कायदेशीर प्रक्रिया पुर्ण होऊन त्यांची सुटका होण्याची शक्यता आहे. दरम्यान तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर राणा दाम्पत्याला काही अटींचं पालन करावं लागणार आहे. मुंबई सत्र न्यायालयाने ह्या अटी घालत त्यांचा जामीन मंजूर केला आहे. 

Read Also : निवडणुका जाहीर होणार, वाझेचे वारे जोरात वाहणार

काल जामीन मिळाल्याचा दिलासा मिळाला असला तरी नवनीत राणा यांना बुधवारचा दिवस त्रासदायक ठरला. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना काही तासांसाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथे त्यांचे सीटी स्कॅन करण्यात आले. नवनीत राणा अनेक दिवसांपासून पाठदुखीमुळे त्रस्त आहेत. त्यामुळे वेदना कमी करण्यासाठी काल डॉक्टरांनी त्यांना औषधेही दिली. त्यानंतर त्यांना पुन्हा भायखळा तुरुंगात आणण्यात आले. दरम्यान आज या दाम्पत्याची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. तुरुंगातून दोघांची सुटका झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या त्यांच्या खार येथील निवासस्थानी त्यांची भेट घेणार आहे. सुत्रांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केल्यनंतर पाच अटी घातल्या आहेत.

Read Also : एका आठवड्यात महापालिका निवडणुका जाहीर करा- SC

या पाच अटींवर जामीन मंजूर

न्यायालयानं घातलेल्या अटींनुसार, रवी राणा आणि नवनीत राणा यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई असेल. तसंच तपासात कोणतेही अडथळे आणू नये, असे आदेश न्यायालयानं दिलेत. अशा प्रकारचे आणखी कोणतेही वादविवाद करू नये.या घटनेशी संबंधित असलेल्या साक्षीदारावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही, त्यांना प्रलोभने दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही. या संपूर्ण प्रकरणावर कोणतीही पत्रकार परिषद घेणार नाही अशीही एक अट न्यायालयाकडून घातली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी