मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) व आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) दिल्लीला (Delhi) रवाना होण्यासाठी मुंबईहून (Mumbai) निघाले आहेत. मुख्यमंत्री (Chief Minister) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशानुसार पोलीस व तुरुंग प्रशासनाने (Prison administration) महिला खासदाराला (female MP) जी वागणूक दिली, त्याची तक्रार आम्ही दिल्लीत करणार असल्याचे रवी राणा यांनी सांगितले आहे. नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा यांनी दिल्लीला जाण्यापूर्वी सोमवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर आगपाखड केली. यावेळी त्यांनी तुरुंगात नवनीत राणा यांना कशी वागणू देण्यात आली. तसेच रवि राणा यांच्या घरावर बीएमसीने कारवाई करण्यासाठी पथक पाठवलं होतं. त्यावरुनही त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांचे पथक तपासणीसाठी आमच्या घरी पाठवले होते. उद्धव ठाकरे यांनी खुशाल आम्च्या घराची ऑनलाईन पाहणी करावी. माझा मुंबईत एकच फ्लॅट आहे. उद्धव ठाकरे यांना माझ्या घराची पाहणी करायची असेल तर रिकामटेकडे बसलेल्या संजय राऊत आणि अनिल परब यांनाही माझ्या घराची पाहणी करण्यासाठी पाठवावे आणि घराचा प्रत्येक कोपरा तपासावा, असे रवी राणा यांनी म्हटले.
हनुमान चालिसाचा आग्रह केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गुंडांनी आमच्या मुंबई व अमरावतीतील घरांवर हल्ला केला. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आम्हाला 20 फूट गाडण्याची भाषा केली. त्यासाठी स्मशानभूमीत सामान पोहोचवल्याचेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याप्रकरणी आम्ही मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी अद्याप त्यावर कारवाई केलेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे व संजय राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्याकडे तक्रार करणार आहोत, अशी माहिती नवनीत राणा यांनी दिली.
Read Also : दोन वर्षानंतर विठूरायाला भेटणार वारकरी, आषाढी वारीची घोषणा
आम्ही दिल्लीत जाऊन मुंबई पोलीस आणि संजय राऊत यांची तक्रार करणार आहोत. नवनीत राणा आणि रवी राणा दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना भेटणार आहेत. देशाचे गृहमंत्री महिलांचा आदर करणारे आहेत. ते आमची तक्रार ऐकून घेतील, असा विश्वास आम्हाला आहे. राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या दडपशाहीची आम्ही तक्रार करणार असल्याचेही रवी राणा यांनी म्हटले. आम्ही दिल्लीत या सगळ्याचा पाठपुरावा करत राहू, असेही त्यांनी म्हटले.
Read Also : शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, 7 च्या आत होणार पगार
महाराष्ट्रात तुरुंगात जाणारी मी पहिली महिला खासदार आहे. तुरुंगात प्रत्येकाला कैद्याप्रमाणेच वागणुक दिली जाते, हे मला मान्य आहे. मात्र, त्याबाबतही काही नियम आहे. मला तुरुंग प्रशासनाने जाणूनबुजून हिन वागणूक दिली. तुरुंगात माझा छळ करण्यात आला. माझी तब्येत बिघडल्यानंतरही योग्य उपचार दिले गेले नाही. माझी तब्येत बिघडल्यानंतरही रुग्णालयात दाखल करण्यासाठी जाणूनबुजून उशीर करण्यात आला. हे सर्व उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावरच करण्यात आले. अहंकारी मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर अन्याय केला, असा आरोप करत या सर्व बाबींची माहिती आपण दिल्लीत देणार असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या.
आम्हाला खार पोलीस ठाण्यात पोलिसांना चहा पाजला. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी आम्ही तुम्हाला जामिनावर सोडू, असे सांगितले. मात्र, त्यानंतर कोणालाही पत्ता न लागू न देता आम्हाला सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. रात्री साडेबारा वाजता आम्हाला सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्याठिकाणी तुम्हाला उद्या सकाळी न्यायालयात नेऊ, असे सांगण्यात आले. सकाळी पाच वाजेपर्यंत आम्हाला पाणी आणि सतरंजीही देण्यात आली नव्हती. त्यामुळे आम्ही पोलिसांनी व्यवस्थित वागणूक दिली नाही, असा आरोप केल्याचे रवी राणा यांनी स्पष्ट केले.
लिलावती रुग्णालयातून बाहेर येताच नवनीत राणा व रवी राणा यांनी हनुमान चालिसावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यामुळे राणा दाम्पत्यावर जामिनाच्या प्रमुख अटीचे उल्लंघन केल्याचा दावा सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी केला होता. त्यामुळे राणा दाम्पत्याला मिळालेला जामीन रद्द करावा, यासाठी आज कोर्टात अर्जदेखील करणार असल्याचे प्रदीप घरत यांनी सांगितले होते. त्यावर नवनीत राणा म्हणाल्या, आम्ही न्यायालयाचा कोणताही अवमान केलेला नाही. खार येथील घरामध्ये पोलिसांसोबत जी काही बाचाबाची झाली व मातोश्रीसमोर हनुमान चालिसाच्या आग्रहाबाबत, कोणतेही वक्तव्य करू नका, अशी कोर्टाची अट होती. या दोन्ही प्रकरणांबाबत आम्ही कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.