Sushant singh Rajput प्रकरणात Aaditya Thackeray यांना गोवण्याचा राणेंचा डाव, केसरकरांचा गौप्यस्फोट

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्याच्यात सर्वात मोठा वाटा नारायण राणे यांच्या पिता पूत्रांचा होता. 

Breaking News
आदित्य यांच्या बदनामी करण्यात राणेंचा मोठा वाटा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्याच्यात सर्वात मोठा वाटा नारायण राणे यांच्या पिता पूत्रांचा होता. 
  • त्याच्यात सर्वात मोठा वाटा नारायण राणे यांच्या पिता पूत्रांचा होता. 
  • आदित्य यांच्या बदनामीने दुखावल्यानं भाजपला जाब विचारला होता असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे.

मुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्याच्यात सर्वात मोठा वाटा नारायण राणे यांच्या पिता पूत्रांचा होता. आदित्य यांच्या बदनामीने दुखावल्यानं भाजपला जाब विचारला होता असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. पुन्हा एकदा राणे विरूद्ध केसरकर यांनी आघाडी उघडल्याने सर्वजण बुचकळ्यात पडले आहेत. 

नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांनी आदित्य ठाकरेंवर खोटे आरोप केले होते. त्यानंतर शिवसेनेची सर्व जण व्यथित झाले होते. यात या 50 आमदारांचा समावेश होता. आपल्या कुटुंबातील तरूण व्यक्तीची बदनामी झाली आणि त्याला भविष्यात पुढे मोठी राजकीय कारकिर्द असेल, त्यामुळे आम्ही दुःखी झालो होतो. त्यामुळे मी स्वतः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांच्या कानी ही सर्व वस्तूस्थिती घातली होती. ते अत्यंत स्ट्रिक पंतप्रधान आहेत, मी कोण आहे याची त्यांनी माहिती घेतली असेल, त्यानंतर त्यांनी सर्व ऐकून घेतल्याचे केसरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

अधिक वाचा : मोठी बातमी.. 'या' दिवशी होणार शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

सुशांत सिंग राजपूत याचे प्रकरण झाले होते. त्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. ती भाजपच्या कार्यालयात झाली होती. त्यावेळी जी बदनामी झाली आदित्य साहेबांची त्यामुळे अनेक जण नाराज झाले होते. अनेक लोकांनी मोर्चे काढले. मी एकट्या वतीने बोलत नाही. मी 50 आमदारांच्या वतीने बोलतो आहे. मला कोणी सांगितलं नव्हतं तरी मी पंतप्रधान मोदींशी संपर्क साधला आणि हे बोलणं खरं होते त्यामुळे ते पंतप्रधान महोदयांपर्यंत पोहचलं. त्यानंतर पंतप्रधान आणि उद्धव ठाकरे साहेबांचा डायलॉग सुरू झाला. महत्त्वाचे मुद्दे आम्ही उद्धव ठाकरे आणि मोदी यांच्याकडे पोहचवत होतो. कारण ही दोन्ही महान माणसं आहेत. त्यांच्या बोलण्यातील एखादी गोष्ट चुकू नये. म्हणून योग्य ती काळजी घेण्यात आली.

अधिक वाचा : प्रभाग रचनांच्या संदर्भात राज्य सरकारचा निर्णय; शिंदेंचा नवा धक्का, मविआला बसला मोठा झटका

त्यानंतर पंतप्रधान आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेटही झाली होती. कुटुंबप्रमुख कसा असावा हे पंतप्रधानांनी त्याठिकाणी दाखवून दिलं. त्यांच्या बोलण्यातून आणि निरोपातून बाळासाहेब ठाकरेंबाबतचा आदर आणि ठाकरे कुटुंबाबाबत असलेलं प्रेम वारंवार समोर येत होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीच्या संदर्भातील माहिती उद्धव ठाकरेंकडून कळाली. त्यावर त्यांनी म्हटलं होतं, मला माझ्या पदापेक्षा तुमच्यासोबत असलेले कौटुंबिक संबंध जपण्याला मी जास्त महत्त्व देतो. म्हणून त्याच वेळेला उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाचा त्याग करण्याचं ठरवलं होतं. पुढील १५ दिवसांत ते आपल्या पदाचा त्याग करणार होते. काहीही खोटं बोलून मला कुणाची बदनामी करण्याची गरज नाही. दरम्यानच्या काळात भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन झालं. हे निलंबन ज्यावेळी झालं त्यावेळी भाजपकडून निरोप आला की, आपलं बोलणं सुरू असताना असं निलंबन आणि इतक्या काळासाठी करणं हे योग्य नाही. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंचा समावेश झाला. ही गोष्ट उद्धव ठाकरेंना आवडली नाही आणि पुढील चर्चा थाबंली असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी