मुंबई : हनुमान चालिसावरुन (Hanuman Chalisa) सुरू झालेला राणा- शिवसेना (ShivSena) वाद आता परत वाढणार आहे. घरात अडकलेल्या राणा कुटुंबियांना बाहेर काढण्यासाठी आता नारायण राणे जाणार असल्याची माहिती त्यांनी खुद्द केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Union Minister Narayan Rane) पत्रकार परिषदेत दिली आहे. मुंबई तुमची आहे का, मातोश्रीसमोर केवळ 235 जण तर राणांच्या घरासमोर केवळ 125 जण असल्याचा राणेंचा दावा. राणांच्या घरी मी स्वत: जाणार आणि बाहेर काढणार, असे राणेंनी म्हटले आहे.
नवनीत राणांना बाहेर येऊ दिले नाही तर मी स्वत: त्यांच्या घरी जाईल. राणांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर उद्धव ठाकरे जवाबदार असतील. असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. पोलीस बाहेर काढले, तर 1 तासात राणांना बाहेर काढू, असा दावा नारायण राणेंनी म्हटले आहे.
शिवसेना वातावरण बिघडवत आहे. राष्ट्रपती राजवटीसाठी भाजप हे कृत्य करतेय, असा आरोप चुकीचा आहे आम्हाला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची गरज नाही ते केंद्र सरकार बघून घेईल. संजय राऊत फुकट धमक्या देत आहेत. उगीच खोटे आरोप करून राजकारण शिवसेना करीत आहे. आधी तलवार होती आता गदाधारी झाले. काहीही ते बोलत आहेत. उद्धव ठाकरेंना चालता येते का? असा सवालही राणेंनी केला.
देशातील प्रगत राष्ट्र महाराष्ट्र आहे पण आज राज्याचे हाल बघा, मराठी माणसांची शिवसेना आहे त्यांच्या नोकरी धंद्याचे काय, राज्यात विजेचे संकट आहे पण वीजच नसेल तर नोकरी धंद्यांचे काय असा सवालही राणे यांनी केला. राणांचे जात प्रमाणपत्र बोगस म्हणणाऱ्या संजय राऊताचे नाव मतदार यादीत होते का असे म्हणत नारायण राणे यांनी संजय राऊत यांना मी खासदार बनविले. फार्म भरताना त्यांनी खोटे कागदपत्रे दिली होती असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.