Raosaheb Danave Corona Positive : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांनी कोरोना टेस्ट करण्याचे आवाहन

Raosaheb Danave Corona Positive भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावरून त्यांनी ही माहिती दिली आहे. आपल्या संपर्कात जे जे आले आहेत त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. 

Raosaheb Danve
रावसाहेब दानवे 
थोडं पण कामाचं
  • केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची
  • सोशल मीडियावरून त्यांनी ही माहिती दिली आहे.
  • रावसाहेब दानवे यांच्यासह  पाच केंद्रीय मंत्र्यांना कोरोनाची लागण

Raosaheb Danave Corona Positive : मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावरून त्यांनी ही माहिती दिली आहे. आपल्या संपर्कात जे जे आले आहेत त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. रावसाहेब दानवे यांच्यासह  पाच केंद्रीय मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 


केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्याला कोरोनाची लक्षणे जाणवल्यानंतर कोरोना टेस्ट केली, ही टेस्ट पॉझिटिव्ह आली असून आपण आयसोलेट होत असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. तसेच जे जे लोक माझ्या संपर्कात आले आहे त्यांनी कोरोना चाचणी करावी आणि काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. 

या नेत्यांना कोरोनाची लागण

गेल्या काही दिवसांत कोरोनाचे संकट वाढत आहे. केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोनाची लागण झाली होती. पवार नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार आहेत. यापूर्वी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, भाजप आमदार विद्या ठाकूर यांनाही कोरोनाची लागण झाली होती. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या बंगल्यातील चार कर्मचार्‍यांनाही कोरोनाची लागण झाली होती. 


केंद्रीय मंत्र्यांना कोरोनाची लागण

केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्र नाथ, पराराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांना चार जानेवारी कोरोनाची लागण झाली आहे. २ जानेवारीपासून त्यांना अस्वस्थ वाट होते. कोरोना टेस्ट केल्यानंतर त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. गुरूवारी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्र नाथ यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना टेस्ट करावी असे आवाहन त्यांनी केले आहे. तर केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. केरळच्या कझीकोडे रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी