मुंबई: मुंबई पोलिसांनी ५८ वर्षीय डॉक्टरला एका महिला पेशंटवर बलात्कार आणि ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांच्या मते, बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगशिवाय या डॉक्टरवर २७ वर्षीय पीडित महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे.
मेघवाडी पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा देखील नोंदवण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास देखील सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण २०१५ मधील आहे. जेव्हा पीडित महिला ही डॉक्टर वंशराज द्विवेदीकडे आपल्या पाइल्सच्या आजारावरील उपचारांसाठी डॉक्टरांकडे गेली होती. डॉक्टरने दुसऱ्या व्हिजिटदरम्यान महिला पेशंटला गुंगीचं इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं होतं.
महिलेला बेशुद्ध केल्यानंतर डॉक्टरने तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ शूट केला होता. ज्यानंतर डॉक्टर या व्हिडिओची धमकी देत तिला सतत ब्लॅकमेल करत होता. त्यानंतर त्याने या महिलेचं शारीरिक शोषण देखील सुरु केलं. या डॉक्टरने महिलेला जवळजवल ३ ते ४ वर्ष ब्लॅकमेल केल. मागील वर्षापर्यंत तो तिला ब्लॅकमेल करत होता. पण काही महिन्यांपूर्वीच पीडितेचं लग्न झालं. त्यानंतर तिने डॉक्टरचा फोन उचलणं बंद केलं होतं. त्यामुळे त्याने तिचा व्हिडिओ व्हायरल देखील करुन टाकला होता.
एके दिवशी महिलेच्या पतीकडे हा व्हिडिओ पोहचला. त्यामुळे त्याला प्रचंड धक्का बसला. त्यामुळे सर्वात आधी तिच्या पतीने या संपूर्ण प्रकरणाची हकिकत ऐकून घेतली. त्यानंतर त्याने पीडित महिला आणि तिच्या पतीने आरोपी डॉक्टरविरोधात गुन्हा देखील दाखल केला. याप्रकरणी कारवाई करताना पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली. तसंच त्याला कोर्टासमोर देखील हजर केलं. सध्या कोर्टाने याप्रकरणी त्याला १७ ऑक्टोबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सध्या पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.
दरम्यान, डॉक्टरने केलेल्या या कृत्यामुळे त्याच्या डॉक्टरकी पेशालाच त्याने काळं फासलं आहे. दुसरीकडे या संपूर्ण प्रकारने पीडित महिलेला खूपच मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे आरोपी डॉक्टरला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशीही पीडित महिलेने मागणी केली आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.